मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स(Amazon) इंडस्ट्रीज (RIL) वॉल्ट डिस्नेकडून टाटा प्लेमधील 29.8 टक्के हिस्सा घेण्याच्या विचारात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे हे पाऊल भारतातील टेलिव्हिजन वितरण क्षेत्रातील धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.
टाटा समूहाची(Amazon) होल्डिंग कंपनी टाटा सन्सची सॅटेलाइट टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर टाटा प्लेमध्ये 50.2 टक्के आणि वॉल्ट डिस्नेची 29.8 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित भागभांडवल सिंगापूर फंड टेमासेककडे आहे.
टाटा प्लेवरील चर्चा यशस्वी झाल्यास, टाटा समूह आणि अंबानी पहिल्यांदाच एका उपक्रमात संयुक्त भागीदार होतील आणि टाटा प्ले प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमाचा विस्तार केला जाईल. असे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे.
डिस्नेने टाटा प्लेच्या सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरच्या वेळी कंपनीतून बाहेर पडण्याची योजना आखली होती परंतु यास उशीर झाला आहे आणि अमेरिकन कंपनी आपल्या गुंतवणूकीतून बाहेर पडण्यासाठी इतर पर्याय शोधत आहे. याबाबत रिलायन्स, डिस्ने आणि टाटा सन्सच्या प्रवक्त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
टेमासेकने गेल्या वर्षी टाटा समुहाशी कंपनीतील 20 टक्के भागभांडवल 1 अब्ज डॉलर मूल्यावर विकण्यासाठी देखील चर्चा केली होती. पण पुढे ही डील झाली नाही. टाटा प्लेमधील स्टेक खरेदी करून, रिलायन्स आपल्या जिओ सिनेमाचा संपूर्ण कंटेंट टाटा प्लेच्या ग्राहकांना उपलब्ध करून देऊ शकते.
टेमासेक टाटा प्लेमधील आपला हिस्सा टाटा समूहाला विकण्यासाठी बोलणी करत आहे. मात्र या प्रकरणी चर्चा पुढे गेलेली नाही. आता रिलायन्स आणि टाटा प्ले यांच्यातील करार निश्चित झाला तर टाटा समूह आणि रिलायन्स समूह यांच्यातील हा पहिलाच उपक्रम असेल. यामुळे रिलायन्सच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म JioCinema ला टाटा प्लेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. जर हा करार झाला, तर रिलायन्सला त्याच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म JioCinema चे संपूर्ण कंटेंट कॅटलॉग टाटा प्ले ग्राहकांना देऊ करायचे आहे.
बँकर्स सध्या टाटा प्लेमधील डिस्नेच्या स्टेकचे मूल्यमापन करत आहेत. टाटा प्लेची बाजारात चांगली पकड आहे पण नेटफ्लिक्स, हॉटस्टार, जिओसिनेमा आणि ॲमेझॉन प्राइम याचा सामना करावा लागत आहे. टाटा प्लेला गेल्या आर्थिक वर्षात १०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला ६८.६० कोटी रुपयांचा नफा झाला होता.