TMC : पाणी बील थकविलेल्यांसाठी मोठी बातमी,एक एप्रिलपासून नळ जोडणी बंद करण्याची कारवाई वेग घेणार…

Spread the love

ठाणे – जल देयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल-२०२३ ते मार्च-२०२४ या काळात ४४३० नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बील भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत, त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई एक एप्रिलपासून सुरू करण्यात यणार आहे.

ठाणे महापालिकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २०१ कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ११४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केलेली नाहीत, त्यांनी ३१ मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जे घरगुती नळसंयोजन धारक ३१ मार्च २०२४पर्यंत थकीत पाणी बील, चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील, त्यांना त्या थकित बिलावरील प्रशासकीय आकारातून १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना, तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page