मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या प्रेरक नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत. – ताम्हाणे ग्रामस्थ.

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | नोव्हेंबर १८, २०२३.
संगमेश्वर (दक्षिण) तालुका उपाध्यक्ष श्री. अभिजीत सप्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ताम्हाणे गावातील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “स्वातंत्र्योत्तर काळात अनेक पंतप्रधानांची कारकीर्द यशस्वी ठरली. मात्र सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारित देशाचा कारभार करणारे पंतप्रधान म्हणून ‘या सम हा’ असेच म्हणावे लागेल. कोणताही आपपरभाव मनात न बाळगता सर्वांसाठी सर्व काही देण्यासाठी सदैव तत्पर असलेले हे नेतृत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले असताना आम्ही अजूनही दुसऱ्या पक्षात रहाणे योग्य नाही याची आम्हाला जाणीव झाली. आणि अभिजीत सप्रे यांच्या प्रयत्नांमुळे आम्ही सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन २०२४ साली मोदीजींसाठी काम करायचे असे ठरवूनच हा पक्षप्रवेश केला आहे.”
पक्ष प्रवेश करणाऱ्या ताम्हाणे ग्रामस्थांमध्ये उत्साह आणि आनंद पहायला मिळत होता. स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश खाके, श्री. सुरेंद्र कुळ्ये, श्री. राजा माचीवले, श्री. मुकुंद घाटवळ, श्री. जयेंद्र कुळ्ये, श्री. विजय कुळ्ये, श्री. अभिजीत खाके, श्री. किरण खाके, श्री. सुजल कानसरे, श्री. भुषण कुळ्ये, श्री. चेतन कुळ्ये, श्री. प्रणव खाके, श्री. प्रवीण कुळ्ये आदी ज्येष्ठ, अनुभवी तसेच उर्जावान युवा ग्रामस्थांनी संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये, तालुका उपाध्यक्ष श्री. अभिजीत सप्रे, देवरुख शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये, सोशल मिडिया जिल्हा संयोजक श्री. अमोल गायकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. प्रथमेश धामणस्कर, उपाध्यक्ष श्री. देवा भाट्ये आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.