बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी पती केएल राहुलसोबत लग्न केल्यापासूनच चर्चेत आहे. २३ जानेवारी रोजी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. दोघांचे लग्न बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर झाले. केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचे, संगीत आणि हळदी समारंभाचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. आता त्यांच्या लग्नाच्या आफ्टर पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या फोटोंचा बोलबाला आहे. आता केएल राहुलने आफ्टर पार्टीचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राहुल आणि अथिया एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. आता त्याच्या या व्हिडिओवर चाहते खूप प्रेम व्यक्त करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये अनेक चाहते दोघांनाही लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसले.
या व्हिडिओमध्ये अथिया लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यासोबत तिने हेवी ज्वेलरी कॅरी केली आहे, जी तिच्या ड्रेसमुळे हायलाइट होत आहे. अथियाने गळ्यात चोकर आणि कानात हिऱ्याचे झुमके घातले आहेत. मात्र, व्हिडिओमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अथिया शेट्टीच्या हिऱ्याच्या मंगळसूत्राने. व्हिडिओमध्ये अथिया तिचे डायमंड मंगळसूत्र फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याच वेळी, केएल राहुल देखील काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अप्रतिम दिसत आहे.