निधी मंजुर होवुनही अर्जुना कालव्याचे काम रखडले , पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ व नियोजनशुन्य कारभाराचा फटका…

Spread the love

कालव्याची कामे रखडल्याने शेतकरी पाण्यापासुन वंचित, शेतकऱ्यान्मध्ये नाराजी

राजापूर /प्रतिनिधी – पंतप्रधान सिंचन योजनेतंर्गंत कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध होऊन देखील पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढीसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे अर्जुना कालव्याचे काम गेले दोन वर्षे रखडलेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गांमधून कामालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अधिक्षक अभियंता पाटबंधारे बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी या कामांकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.      

राजापूर तालुक्याच्या पूर्व परीसरात करक, पांगरी गावांत उभारण्यात आलेला अर्जुना प्रकल्प हा जिल्ह्यातील एक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून याकडे पाहीले जाते. हा प्रकल्प पुर्णत्वाला गेला असून या धरणात पाण्याचा साठा देखील मुबलक प्रमाणात आहे. मात्र, कालव्याची कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने परिसरातील शेतकरी धरण्याच्या पाण्यापासून आजही वंचित आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून कालव्याच्या कामासाठी दोन वर्षापुर्वीच कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला अहे. मात्र, पाटबंधारे बांधकाम विभागाच्या ढीसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे डाव्या व उजव्या कालव्याची कामे रखडलेली आहेत.

मागील वर्षी प्रकल्पाच्या कालव्यासाठी उत्खनन करण्यात आलेली माती जैसे थे ठेवण्यात आल्याने शेतकऱयांना शेती करता न आल्याने शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात झाले. याबाबत सबंधित अधिकारी व ठेकेदार यांना वारवांर सांगून देखील त्यांनी याची दखल घेतलेली नाही. शेतकऱयांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकही पैसा मोबदला म्हणून दिलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गांमधून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

पुर्वी या कालव्याचे काम एपन कालवा पध्दतीने करण्यात येणार होते. मात्र, आता या कामात बदल करून बंदिस्त पाईपद्वारे करण्यात येत आहे. या कालव्याचे डाव्या उजव्या अशा दोन्ही बाजने काम सुरू आहे. नियोजित मार्गातून पाईप लाईन टाकण्यासाठी जमीन खोदकाम सुरू आहे. मागील वर्षी पाईपलाईन टाकताना खोदण्यात आलेली माती तशीच ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱयांना शेती करता आली नाही. खोदकाम करताना सापडलेले मोठ-मोठे दगड न उचलता ते शेतकऱयांच्या शेतातच ठेवण्यात आले. खोदलेले चर व्यवस्थित न भरल्याने त्यातून वाहून गेलेली माती इतरत्र शेतीत पसरली. त्यामुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  

बऱयाच ठिकाणी खोदकाम करताना शेतकऱयांच्या बागायती व पुंपणाचेही नुकसान झालेले आहे. आंबा-काजू बागायतींचे मागणी करूनही अद्याप मुल्यांकन करण्यात आलेले नाही. मुल्यांकनच झाले नसल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहे. येथील शेतकऱयांचे शेती हेच उत्पन्नाचे एकमेव साधन असल्याने शेतकऱयांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. पाटबंधारे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांनी शेतकऱयांच्या या नुकसानीची पहाणी करून शेतकऱयांना न्याय द्यावा, अशी मागणही शेतकऱ्यांनी केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page