*संगमेश्वर /प्रतिनिधी /दिनेश अंब्रे –* पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स च्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री.जनार्दनशेठ शिरगावकर यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल शेठ शेट्ये यांना विश्व समता कला मंच लोवले यांच्यातर्फे ” विश्व खेल रत्न ” सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सन 1975 पासून पुढे 20 वर्ष संगमेश्वर मध्ये हॉलीबॉल या खेळासाठी मैदान गाजवलेले श्री.अनिल शेठ शेट्ये हे नावाजलेले खेळाडू होते. संगमेश्वर सारख्या छोट्याशा गावामध्ये हॉलीबॉल सारखा खेळ त्यांनी जिवंत ठेवला होता. श्री अनिल शेठ शेटे हे फक्त खेळातच नव्हे तर संगमेश्वर मध्ये सामाजिक क्षेत्रात आणि अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचं सहकार्य लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच लाभत आलेले आहे. सर्व समाजातील लोकांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्याकडे आहे. त्यासाठीच सामाजिक,शैक्षणिक आणि खेळातील विशेष त्यांच्या कार्यासाठी हे सन्मानपत्र त्यांना देण्यात आले.
तसेच ॲडव्होकेट अमित शिरगावकर यांच्या हस्ते चेअरमन श्री अनिल शेठ शेट्ये यांना ” भारतीय संविधान “हे पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा पाटणे, एल पी इंग्लिश मीडियम स्कूलचेअध्यक्ष श्री.विलास शेठ पाटणे, पैसा फंड संस्थेचे उपाध्यक्ष माननीय किशोर शेठ पाथरे,सचिव धनंजय शेट्ये सर,सदस्य रमेश शेठ झगडे, सदस्य संदीप शेठ सुर्वे,संजय शिंदे मुख्याध्यापक खामकर सर आदी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव माननीय श्री धनंजय शेट्ये सर यांचा शैक्षणिक कार्यात केलेल्या योगदानाबद्दल श्री दिनेश अंब्रे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.ऍडडव्होकेट अमित शिरगावकर यांच्या हस्ते सचिव श्री.धनंजय शेट्ये सर यांना कायद्याची पुस्तके भेट दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून श्री.संजय शिंदे यांच्याकडून महिला शिक्षिका सौ. अमृता कोकाटे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. टीव्हीवरील बालकलाकार कुमारी.आद्या शिरगावकर हिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान श्री. अनिल शेठ शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्य अविष्कारामध्ये गणेश वंदना, शिवकन्या, शिवमावळे, जाकडी नृत्य, नमन, महाराष्ट्रातील विविध सण नृत्य, सामाजिक विषयावर आधारित वेगवेगळ्या कार्यक्रमानी प्रेक्षकांची मने जिंकली.
वादक गिरीराज लिंगायत आणि शिवम भोसले यांनी आपल्या कलेची अदाकारी दर्शवली. मनीष जाधव आणि साईराज जाधव यांनी स्त्री वेशातील गवळण नृत्य अतिशय उठावदारपणे सादर केली.
मान्यवरांनी प्रशालेची आर्ट गॅलरी पाहून चित्रकार विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्व कार्यक्रमाचा मुख्य गाभा असतो तो म्हणजे सूत्रसंचालन. सौ अमृता कोकाटे मॅडम आणि श्री.विनोद ढोर्लेकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना प्रत्येक नृत्यातील आशय आणि गाभा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्वतःच्या शब्दात मांडले आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.