उल्हासनगर (अशोक शिरसाट)
उल्हासनगर शहरात काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अनिल यादव यांची उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी केली आहे नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संघटना प्रशासन नानाभाऊ गावंडे. प्रदेश काँग्रेस उत्तर भारतीय सेलचे सुरेंद्र सिंग व सेल विभागाच्या समन्वयक प्रज्ञा वाघमारे यांच्या हस्ते काँग्रेस कार्यालय टिळक भवन मुंबई येथे देण्यात आले यावेळी प्रदेश काँग्रेसचे ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष नितीन पाटील. रोजगार स्वयंरोजगार सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील. यावेळी उपस्थित होते तसेच शाॅप नं ४ ब लिटील पॅलेस समोर शिव काॅलनी ओ टी सेक्शन, उल्हासनगर – ५ येथे काॅग्रेस पार्टीचे उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवार दि ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून काॅग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी अभिवादन केले तसेच उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्ष पदी अनिल यादव याची निवड झाली म्हणून अनिल यादव यांचा सत्कार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी यादव यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काॅग्रेस सेवादलाच्या सचिव फातिमा खान, काॅग्रेस सेवादल प्रदेश सचिव रविन्द्र श्रीवास्तव , उल्हासनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, भागवत तायडे, भास्कर परवाने, सदस्य राजकुमारी नारा, वसंत पाटील, पत्रकार राजकुमार, यांच्या आदी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या