” धने व जिरे भरडपूड ” आरोग्यासाठी वरदान…

Spread the love

कृती —
50 ग्रॅम धने आणि 50 ग्रॅम जिरे लोखंडी तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्यात किंवा मिक्सरमधे जाडसर भरडपूड करणे. बारीक पावडर नाही.

घेण्याचे प्रमाण
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाच दिवस घेणे. एक दिवस थांबून पुन्हा पाच दिवस घेणे. असे तीन वेळा करणे. म्हणजे पंधरा दिवस घेणे. आणि त्यानंतर सुद्धा गरजेनुसार घेणे.

एका व्यक्तीसाठी प्रमाण
एका स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी घेणे. त्यामध्ये एक लहान चमचा धनेजिरे भरडपूड टाकणे आणि अर्धा लहान लिंबू सालीसकट बारीक चिरून टाकणे. तुळशीची पाने उपलब्ध झाल्यास पाच पाने घेणे. नंतर गँसवर ठेवून एक उकळी काढणे. शेवटी गाळून ते पाणी बशीतून गरम – गरम असतानाच पिणे.

फायदे

१) शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.

२) हार्टॲटेक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.

३) किडणीस्टोन विरघळतात. लघवी त्रास कमी होतो.

४) शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.

५) पोट लवकर साफ होते. शरीर हलके होते.

६) रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.

७) उत्साह वाढून हुशारीपण वाढते अशक्तपणा येत नाही.

८) रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारांवर औषध म्हणजे धने – जिरे भरडपूड होय.

९) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

१०) लिंबू म्हणजे शरीर आतून स्वच्छ करणारी केरसुणी आहे. त्यामुळे शरीरातील घाण लवकर बाहेर पडते.

११) या उपायाने 100 % निरोगी राहता येते. आयुष्यमान वाढते. प्रतिकारशक्ती वाढते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page