बहुगुणी आवळा-स्वास्थ्य कारक व रोग बरा करण्यात आयुर्वेदात आवळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे…

Spread the love

▪️स्वास्थ्य कारक व रोग बरा करण्यात आयुर्वेदात आवळ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आयुर्वेदामध्ये तसेच अनेक ग्रंथात बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. साधारण हिवाळ्यात येणारे फळ आहे. हिवाळ्याच्या प्रारंभी म्हणजे ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येणारा लहान आकारातील आवळा हा रसपूर्ण नसल्याने त्याचा वीर्य वाढीच्या दृष्टीने पाहिजे तसा नसल्याने फायदा होत नाही. परंतु डिसेंबर महिन्यात आवळा रसपूर्ण होतो व त्यात शक्तीवर्धक रसायने समाविष्ठ होत असतात. आवळा हे फळ आ पल्याला वर्षभर फळ तसेच औषध म्हणून वापरता येऊ शकते.

आयुर्वेदात आवळ्याचे महत्त्व विषद करतांना एक छान श्लोक आलाय यात श्लोक कार म्हणतात.’अमलात कातू अश्रू जलात आगतूम’.म्हणजे भगवान विष्णू व लक्ष्मीच्या डोळ्यातून जे अश्रू जमीनीवर पडले या पासून आवळा निर्माण झाला. याचे शास्त्रीय लँटीन नांव फायलँन्टस इंम्बालिका असून हा संस्कृत मधील आमलिका या शब्दाचा अपभ्रंश आहे. आवळ्याचा समावेश महर्षि चरक वयःस्थापक म्हणजे नित्य सेवन केले असता म्हातारपण जवळपास फिरकत नाही तसेच विरेचनोपग म्हणजे विरेचन कार्यात मदत करणार्या वर्गात केला आहे.

सगळ्यात जास्त क जीवन सत्वाचा स्त्रोत आवळ्यात आहे. आवळ्याचा वापर चेतासंस्था म्हणजे नर्व्हस सिस्टीम, पाचनसंस्था म्हणजे डायजेस्टीव्ह सिस्टीम, रक्तवहसंस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, श्वसनसंस्था म्हणजे रेस्पायरी सिस्टीम, मुत्रवह संस्था म्हणजे युरिनरी सिस्टीम, प्रजनन संस्था म्हणजे रिप्राँडक्टीव्ह सिस्टीम, व स्कीन म्हणजे त्वचा आशा शरीराच्या सर्व भागावर करता येतो.रोज एक आवळा खाणार्याला कुठलेही रोग होत नाहीत. जवळपास सर्व रोगावर आवळा चालतो.विशेष म्हणजे तो कापला,वाळवला,भाजला,पावडर केली,रस काढला तरीही तेच गुण कायमस्वरूपी ठेवतो.सर्व प्रकारच्या त्रिदोषातून येणाऱ्या आजारात आवळा वापरता येतो.म्हणून तर सुश्रुत सुत्र४६मध्ये म्हंटल आहे.

अम्लं,सुमधुर, तिक्त,कषायं कटुं रसम।
चक्षुष्य सर्वदोषध्नं वृण्यमामलकीफलम।।
हन्ति वातं तदम्लवात्पितं माधुर्यशैत्यतः।
कफं रूक्षकषाय त्वाफळेभ्योs भ्याधिकं च यत् ।।

असे हे फळ

▪️समस्त मानवजातीला वरदान आहे. रोग शरीराच्या कुठल्याही अवयवात व कुठल्याही प्रकारात असला तरीही म्हणूनच तो चालतो.समस्त मानवजातीला तो जणू अमृतच आहे.म्हणून जिथे जिथे गरज असेल तिथे आवळा व आवळ्याचे विविध प्रकार वापरता येतील. नखांन पासून शिखांपर्यत,त्वचेवर, जखमेत, अवघड जागी,विविध रोगांवर तो वापरता येईल. पण यासाठी कुठे कसा कधी वापर करावा हे सांगणारा जाणकार वैद्य मात्र सोबत असावा.

🔹️आवळ्यातील घटक-

▪️आवळ्याच्या 100 ग्राम रसात 921 मि.ग्रा. आणि गरात 720 मि.ग्रा. विटामिन सी असते. आर्द्रता 81.2, प्रोटीन 0.5, वसा 0.1, खनिज द्रव्य 0.7, कार्बोहाइड्रेट्स 14.1, कैल्शियम 0.05, फॉस्फोरस 0.02, प्रतिशत, लौह 1.2 मि.ग्रा., निकोटिनिक एसिड 0.2 मि.ग्रा. असते याच्या व्यतिरिक्त यात गैलिक एसिड, टैनिक एसिड, शर्करा (ग्लूकोज), अलब्यूमिन, काष्ठौज इत्यादी तत्व पण असतात.

🔹️औषधी उपयोग-

आवळ्यातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील मुरूम, फोड घालवण्यास मदत करते. रोज आवळा खाल्यानं त्वजा तजेल राहाते.

▪️मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते. तुम्हाला मधुमेह असेल तर आवळ्याच्या रसात मध मिसळून खाल्याने फायदा होतो.(पण मध या सोबत खाण्यात अनेक मतभेद आहेत.)

▪️गर्भवती महिलांनी आवळा खाल्ल्यास बाळ-आईचे उत्तम पोषण होते.

▪️यातीलऔषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते.

▪️तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो

▪️मोरावळा खाल्ल्यानं पोट साफ राहातं, पित्ताचा त्रास होतं नाही. अशक्तपणा दूर होतो. मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी नियमित मोरावळा खावा.

▪️अन्न पचवण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. गॅस,ऍसिडिटी, आबट ढेकर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो.

▪️हिरड्यांमधून रक्त येणे, तोंड येणे यांसारख्या आजारांवर आवळा उत्तम औषध. त्वचेचे आजार उद्भवत नाहीत.

▪️आवळा तुमच्या शरीरातील मेंटबॉलिज्म मजबूत करतो यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.

▪️आवळ्यामुळे स्मरणशक्ती आणि बुद्धी चांगली राहण्यास मदत होते.

▪️आवळा सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे प्रॉब्लेम यामध्ये अराम मिळतो

▪️मुलायम आणि लांब केसांसाठी आवळ्याची पावडर तेलात उकळून लावावी. रोज एका आवळ्याचं सेवन करायला हवं.

▪️आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्याने याचा फायदा तुमच्या डोळ्यांना नक्कीच होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस यासारख्या आजारापासून दूर राहता येत.

▪️तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर रोज एक आवळा कॅण्डी, आवळा सुपारी तुम्ही खाऊ शकता. रोज सकाळी आवळा सरबर घेतलं तरीही आराम मिळतो.

▪️मासिक पाळीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता, रक्ताच्या समस्या या सर्व त्रासावर आवळा गुणकारी ठरतो.

▪️आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात यामुळे फायदा होतो

▪️आवळा पावडर भिजवून ती केसांनाही लावली जाते.

▪️लहान मुलांना मुरांबा किंवा मोरावळा स्वरूपात पोळीसोबत खाण्यासाठी आवळा दिल्यास मुलंही आवळा खातात.

▪️रोज आवळ्याची एक फोड खायला हवी. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते.

▪️आवळ्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन रोखण्याची ताकद असते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने कोणतेही इन्फेक्शन तुम्हाला होत नाही.

▪️ पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे पाव चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते.

▪️डोळ्यांची आग होत असल्यास पाच – सहा तास पाण्यात भिजवलेली आवळकाठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर करण्याचा फायदा होतो.

▪️पोटात, छातीत, घशात पित्तामुळे जळजळत असेल तर पाव चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात अर्धा चमचा साखर व एक चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते.

▪️नाकातून रक्‍त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर करण्याने रक्‍त येणे थांबते.

▪️आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही.

▪️ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.

▪️शरीराचा दाह होत असेल तर अशा अवस्थेत आवळ्याचा रस प्यावा.

▪️मुळव्याधीतून रक्त जात असेल तसंच स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर या सर्व विकारांमध्ये आवळाचूर्ण किंवा आवळा रस घ्यावा.

▪️त्रिफळा चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करून गाळलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. असं केल्याने डोळ्यांचं तेज वाढतं.

▪️आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात.

▪️उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.

▪️अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.

▪️नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा किंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो.

▪️आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग बरा होण्यास प्रतिबंध होतो.

▪️केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.

▪️कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते.

▪️ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते.

▪️जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो.

▪️केसांच्या तक्रारींवर उदा. केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, केस निस्तेज होणं या सर्वावर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते.

▪️तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते.

▪️गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी व सरबत यांचा वापर करावा. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन मळमळ कमी होते.

▪️नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा.

▪️आवळा, हिरडा, बेहडा, जांभुळ बी, कडूिलबाचं चूर्ण, गुळवेल व कारली सुकवून त्यांची पूड समप्रमाणात घेतल्यास मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवता येतो. हे चूर्ण मधुमेही रुग्णांनी पाण्यासोबत सकाळ – संध्याकाळ १-१ चमचा घ्यावं.

▪️नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो.

▪️ ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा हे उत्तम औषध आहे. एक चमचा आवळा चूर्ण नियमितपणे सेवन केल्यास त्वचारोग होत नाहीत

▪️वातामुळे होणार्‍या सांधेदुखीतीही एक चमचा आवळा चूर्ण आणि एक चमचा गुळ एकत्र करून आल्याच्या रस बरोबर घेतल्याबरोबर सांधेदुखी कमी होते. अर्थात ३ महिने औषध घेणे आवश्यक आहे.

▪️पोटामध्ये जंत झाल्यास एक चमचा आवळ्याचा रस आणि एक चमचा ओल्या नारळाचे दूध एकत्र करून जेवणापूर्वी १.५ महिने नियमाने घेतल्यास जंताची तक्रार दूर होते.

▪️आव पडणे, जुलाब या विकारावर आवळ्याच्या रसात सुंठ पूड घालून ते चाटण दोन्ही जेवण पूर्वी १ महिना घेतल्यास आतड्याची शक्ती वाढते.

▪️उचकी किंवा श्वास लागत असेल तर आवळ्याचा रस आणि पिंपळाचे चूर्ण एकत्र करून घेतात.

▪️उन्हाळ्यामुळे डोळ्यांची आग होते किंवा डोळे थकतात अश्या वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने डोळे धुतल्यास हा त्रास कमी होतो आणि डोळ्यांचे स्नायू बळकट होऊन दृष्टी सुधारते.

▪️खरुज झाल्यास आवळकाठी जाळून ती तेलात खालून त्याचा लेप फोडांवर लावावा.

▪️चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत म्हणून आवळकाठी पाण्यात वाटून ती चेहऱ्याला लावावी.

▪️आवळा, माका , ब्राम्ही आणि खोबरेल तेल ह्यांच्या मिश्रणापासून केलेले तेल केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.

▪️आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

▪️ज्यांना पोट साफ होण्यास त्रास होतो. मलावरोध असतो, त्यांनी नियमीतपण आवळ्याचा रस अथवा आवळा खावा. याने पोट नियमीतपणे साफ होऊ लागते.

▪️सेक्स लाइफ सुधारण्यासाठी आवळा फायदेशीर ठरते. त्यामधील व्हिटामिन सी घटक शुक्राणूच्या निर्मितीला चालना देतात. तसंच अधिकवेळ सेक्सचा आनंद घेण्यासाठी शरीरात उर्जा निर्मितीचं काम करतात.

▪️आवळ्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक तोंडातील अल्सरचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

▪️२००४ साली प्रकाशित झालेल्या जर्नल ऑफ फूड अ‍ॅन्ड फंक्शनच्या अहवालानुसार आवळ्यातील गॅलिक अ‍ॅसिड आणि त्यातील अ‍ॅन्टीडायबेटीक क्षमतेमुळे प्रभावशाली ठरते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होतं. तसंच मधूमेहातून वाढणारा हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

▪️आवळ्यामध्ये अनेक औषधी आणि थेरपेटीक गुणधर्म आहेत. त्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

▪️आवळ्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचा मुलायम आणि तजेलदार करायला मदत करते. तसंच एजिंगची समस्या कमी करण्यासही मदत होते.

▪️आवळ्यात असणाऱ्या प्रिव्हेंटीव्ह या गुणधर्मामुळे शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी होतो. अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्मामुळे कॅन्सरच्या उपचारादरम्यानही त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.

▪️आवळा चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवून घातक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतं.

▪️एक चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये 1 चमचा आवळा पावडर आणि 1 चमचा दही मिसळा. ही पेस्ट केसांना लावून एक तासासाठी तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुऊन टाका.

▪️एक कप नारळ तेल गरम करून त्यात 4-5 आवळे आणि 5 ते 6 जास्वंदीचे पान टाका. 20 मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा.

▪️एक चमचा ऍपल साइडर व्हिनेगर मध्ये 10 थेंब आवळ्याचे तेल मिसळा आणि यात एक चमचा मध आणि एक चमचा पाणी मिसला. आता ये मिश्रणाने शांपूनंतर पाच मिनिटापर्यंत आपल्या डोक्याचा मालीश करा आणि मग गार पाण्याने केस धुऊन घ्या.केस शायनी होतात.

▪️एक कप आँलिव्ह तेलात एक चमचा आवळा पावडर आणि मूठभर कढीपत्ता मिसला. 15 मिनिट उकळा आणि गार होण्यासाठी राहू द्या. आठवड्यातून दोनदा रात्री हे तेल लावून सकाळी केस धुऊन टाका पांढरे केस काळे झालेली दिसतील.

▪️अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात आवळा पावडर आणि एक चमचा मध मिसळा. मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. केस ओले करून हे मास्क केसांमध्ये लावा. केस वाळवून शांपूने धुऊन टाका.केसांना दुसरा कंडीशनर वापरायची गरजच पडणार नाही

▪️एक चमचा मेंदी पावडरमध्ये एक चमचा आवळा पावडर मिसळा. आता यात दही टाकून पेस्ट तयार करा. पूर्ण केसांवर लावून एका तासासाठी तसेच राहू द्या. वाळल्यावर शांपूने केस धुऊन टाका.केसांना फाटे फुटणार नाहीत.
या शिवाय ही आवळ्याचे शरीराच्या a to z भागासाठी उपाय असुन इथं केवळ लेखन सीमा लक्षात घेऊन गरजेचे आहेत तेवढेच उपयोग दिलेले आहेत.या व अशा अनेक पोस्ट साठी आयुर्वेद प्रचार हे पेज लाईक करा.पोस्ट लिहताना अनेक संदर्भ व नवीन जुन्या पुस्तकांचा अभ्यास केला जात असल्याने उपाययोजना परिक्षीत असतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page