आंबव-पोंक्षे भुवडवाडी, पकडेवाडी वरचा ‘भार’ हलका,आ. शेखर निकम यांनी केले आंबव पोंक्षे येथील डीपीचे उद्घाटन…

Spread the love

माखजन- संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे भुवडवाडी व पकडेवाडी साठी स्वतंत्र डीपी चालू करण्यात आला आहे. याचे उदघाटन चिपळूण- संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याहस्ते करण्यात आले. स्वतंत्र डीपी मिळावा यासाठी आमदार शेखर निकम यांनी महावितरणकडे विशेष प्रयत्न केले होते.
   
पकडेवाडी, भुवडवाडीमध्ये विद्युत भारामध्ये होणारा सतत चा चढउतार याचा येथील रहिवाशांना सारखा सामना करावा लागत असे. गणपती मध्ये तर येथील व्होल्टेज पूर्णपणे कमी होत असे. यास्तव येथील राहिवाशांची दोन्ही वाड्या ना स्वतंत्र डीपी मिळावा अशी महावितरण कडे अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आमदार शेखर निकम हे, यामध्ये विशेष लक्ष घालून ती मागणी पूर्ण करून देण्यात यशस्वी झाले.

मतदार संघातील प्रत्येक गावाला उन्नतीकडे नेण्यासाठी आपला कसोशीने नेहमीच प्रयत्न राहील असा आशावाद त्यांनी मनोगतावेळी व्यक्त केला. डीपीच्या उदघाटनप्रसंगी संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे मुंबई संपर्क प्रमुख सुरेश घडशी, सरपंच शेखर उकार्डे, गावकर मोहन भुवड, संजय पकडे, सुरेश भुवड, दाजी भुवड, देवजी भायजे, राजेंद्र जाधव, दीपक शिगवण, मंगेश शिगवण, विजय पकडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page