*भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील विनोद कांबळीची अवस्था बघून सर्वांनाच धक्का बसलाय.*
*मुंबई :* एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत विनोद कांबळीची अवस्था अतिशय बिकट असल्याचं दिसून येतंय. रस्त्यानं चालताना त्याला दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. मुंबईच्या रस्त्यावरचा विनोद कांबळीचा हा व्हिडिओ आणि त्यामधील त्याची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसलाय.
*विनोदी कांबळीच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय?…*
या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी एका बाईकचा आधार घेऊन उभा आहे. पण जेव्हा तो चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अडखळतो. त्यानंतर शेजारी उभे असलेले लोक त्याला आधार देतात. विनोद कांबळीला नक्की काय झालं? यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तसेच व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या या माजी क्रिकेटपटूची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब आहे. विनोद कांबळीला अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणानं रुग्णालयात दाखल करण्यात येत असतं.
*सचिनला तेंडुलकराला मदतीचं आवाहन :*
विनोद कांबळीची ही अवस्था बघून काही नेटीझन्सनं त्याचा बालपणीचा मित्र आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला या व्हिडिओवर टॅग करून विनोद कांबळीची मदत करण्याचं आवाहन केलंय. व्हिडिओ शेअर करत एका युजरनं म्हटलंय की, “विनोद कांबळी यांची ही अवस्था पाहून मन हेलावून गेलं. ते एक जबरदस्त खेळाडू होते. त्यांनीही त्यांचा मित्र सचिन तेंडुलकरसारखं आयुष्य जगायला हवं होतं. ते खूप मोठे झाले असते. मात्र आता त्यांची अवस्था वाईट आहे. ते पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो. सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयनंही त्याच्याकडं लक्ष द्यावं.” तर दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली आहे की, “जगातील सर्वात श्रीमंत संस्था बीसीसीआयआपल्या क्रिकेटपटूंना मदत करण्यातही अपयशी ठरत आहे का? अशा क्रिकेट बोर्डाचा उपयोग काय? या खेळाडूंच्या जोरावरच बोर्ड पैसे कमवतो.” दरम्यान, व्हायरल
*Disclaimer- व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.*