नेरळ : सुमित क्षीरसागर
सध्या महिलांचे हळदी कुंकू आदी समारंभ सुरु असतात.
तर अशे समारंभ आयोजित करत शिवसेना ठाकरे गट कायम महिलांचा सन्मान करत असतात. मात्र यंदा या समारंभाला भव्यदिव्य रूप देत या कार्यक्रमाच्या निमित्ताने संसारातून महिलांना थोडा विसावा मिळावा असा प्रयत्न शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सगळ्यांचे लाडके भाऊजी म्हणजेच अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे कर्जत येथे येणार आहेत. त्यांच्यामाध्यातून खेळ मांडीयेला हा खास महिलांसाठी कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व शिवसेना महिला आघाडी यांच्या मध्यातून दिनांक ३ रोजी खेळ मांडीयेला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी कर्जत शिवालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत पोलीस मैदान येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांनी माहिती दिली. जोशी म्हणाल्या कि कर्जत खालापूर विधानसभा मर्यादित हा कार्यक्रम असेल तर गावागावात आमच्या शिवसैनिकांनी महिला भगिनींना या कार्यक्रमाबद्दल सांगितले आहे. त्यामुळेमोठ्या प्रमाणात महिला भगिनी या ठिकाणी येणार आहेत. खेळ मांडीयेला हा आदेश बांदेकर यांचा प्रमुख कार्यक्रम असणार असून यात ३०० महिलांना सहभाग घेता येणार आहे. यासाठी ५ बक्षिसे ठेवली आहे. तर येणाऱ्या प्रत्येक महिलेला मायेची साडी देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी महिलांना एक कुपन देण्यात येणार असून लकी ड्रॉ मधून बक्षिसे काढण्यात येणार आहेत. यासह सर्व महिलांना प्रवेश पास देण्यात आले आहेत. मात्र प्रवेश पास आले नाहीत तरी चिंता करू करू नका, कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांना पास देण्यात येतील. स्वयंपाक घरातून स्वयंपाक आदितून वेळ काढून एक छान असा करमणुकीचा हा कार्यक्रम असेल. महिलांना कुठलाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. याठिकाणी रुग्णवाहिका, डॉक्टर, महिलांसाठी अल्पोपहार, जेवण अशी सगळी व्यवस्था असणार आहे. तर साधारण ३ तासांचा हा कार्यक्रम असेल अशी माहिती जोशी यांनी दिली. तर साधारण २५ हजार महिलांचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला या कार्यक्रमाला उपस्थित असतील तर याठिकाणी कुठलाही पुरुष प्रतिनिधी कार्यक्रमाच्या ठिकाणी असणार नाही. कारण हा कार्यक्रम महिलांचा असेल. तसेच मदतीसाठी स्टेजच्या मागे किंवा बाजूला काही महत्वाचे पदाधिकारी फक्त असणार आहेत अशी माहिती उपतालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, सुदाम पवाळी,महिला आघाडी उपजिल्हा संघटिका अनिता पाटील,कर्जत तालुका संघटक करुणा बडेकर,विधानसभा संघटक
सुनिता विचारे,युवती महिला अध्यक्ष खालापूर भारती लोते,उपशहर संघटक सरेखा प्रधान,युवती शहर संघटक शीतल पितळे,कर्जत शहर संघटक मयुरी गजमल,विभाग प्रमुख गीता पळसकर आदी उपस्थित होते.
जाहिरात