लखनऊहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रेलरने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथे दोन पादचारी महिलांना चिरडले.

Spread the love

लांजा :- लखनऊहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रेलरने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथे दोन पादचारी महिलांना चिरडले. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ४७ , रा. आंजणारी-पेंढारीवाडी) असे तिचे नाव आहे. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडला. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रेलर चालकाला देवधे येथे पकडण्यात आले. गंभीर जखमी महिलेला अधिक उपचारासाठी पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आंजणारी पेंढारीवाडी येथील दोन्ही महिला नेहमीप्रमाणे सकाळी शेतीच्या कामासाठी चालल्या होत्या. मुंबई-गोवा महामार्गावरून चालत जात असताना गोव्याच्या दिशेने जाणार्‍या भरधाव ट्रेलरने या दोघींना धडक दिली. टाटा प्राईमा (एच.आर.३८ व्ही.८७९४ ) चा ट्रेलर सद्दाम हकीमुद्दीन अन्सारी (वय २६ , रा. तहसील चैनपूर, जि. कैमूर, बिहार) हा चालवत होता. या ट्रेलरच्या धडकेत पल्लवी प्रकाश पेंढारी (वय ४७ , रा. आंजणारी पेंढारीवाडी) या महिलेला जागीच मृत्यू झाला तर जयश्री धोंडू पेंढारी (वय ५५ , रा. आंजणारी पेंढारीवाडी) ही गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच लांजाचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. हातखंबा वाहतूक पोलिस मदत केंद्राचे कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झाले होते. पकडण्यात आलेल्या ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख करत आहेत.

जाहिरात

त्रिमुखी देवी श्री वरदान मानाई त्रेवार्षिक समायात्रा २०२४- महोत्सव लवकरच…
दिनांक २३जानेवारी ते २५ जानेवारी २०२४
स्थळ – मंदीर परिसर , दहिवली बु. ता. चिपळूण, जि. रत्नागिरी अवश्य भेट द्या! आणि आईचा आशिर्वाद घेऊया

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page