चिपळूण : तालुक्यातील सावर्डे-दहिवली रस्त्यावर गाडी अडवून
क्षुल्लक कारणावरून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी गुरुवारी सावर्डे पोलिसांत तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.सज्जाद हसन काद्री, गुलाम महामुद काद्री, मुस्तफा यासीन काद्री (सर्व अडरेकर मोहल्ला सावर्डे) या तिर्धावर गुन्हा दाखल केला आहे.
याची फिर्याद जितेंद्र मनोहर चव्हाण (४३, खोतवाडी, सावडे) यांनी दिली. जितेंद्र चव्हाण दुचाकीने सावर्डेहून दहिवलीकडे जात असताना त्याच्यापुढे सज्जाद काद्री व त्याचे सहकारी आडवी तिडवी गाडी चालवत होते.
याबाबत जितेंद्र चव्हाण यांनी विचारणा केली असता त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी चव्हाण यांना पुन्हा अडवून इसको खतम करता हूँ, असे बोलून त्यांची मान जोरात आवळली, तसेच त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात