
गुहागर : घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत गुहागर तालुक्यातील परचुरी येथे आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर गावचे उपसरपंच असलेल्या 65 वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होतं आहेत. परचुरी गावाचे उपसरपंच असलेले अशोक भुवड (वय 65) यांनी इयत्ता आठवीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. याप्रकारणी पीडित मुलीच्या वडिलांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी उपसरपंच अशोक भुवड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदरील घटनेला काही दिवस झाले आहेत. उपसरपंच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने काही लोकांनी हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला.