अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदावर माझा विरोध नाही,पण…;दानवेंचं सूचक विधान!

Spread the love

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार देखील भाजप सोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. मात्र स्वतः अजितदादा पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. असं असूनही अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरील राजकीय वर्तुळातील चर्चा थांबलेल्या नाहीत. अशातच अजित पवारांनी नुकताच केलेल्या एका विधानामुळे पुन्हा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अजितदादा यांनी आपल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी प्रबळ इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवारांच्या या विधानानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक विधान केलं आहे. अजित पवार बहुमताच्या बाजुने आले तरच ते मुख्यमंत्री होऊ शकतात, असं विधान रावसाहेब दानवेंनी केलं आहे. ते जालना येथून प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेमके काय म्हणाले रावसाहेब दानवे ?

ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. मात्र तरीही तेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही. या सर्व राजकारणातल्या घटना आहेत. मुख्यमंत्री पदावर दावा सांगणं, ही वेगळी गोष्ट आहे आणि बहुमत असणं, ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे अजित पवार बहुमताच्या बाजूने आले तरच किंवा कदाचित १०-२० वर्षांनी त्यांना बहुमत मिळालं तरच ते मुख्यमंत्री होऊ शकतात. माझा त्यांना विरोध नाही. ते एक चांगले कार्यकर्ते आहेत. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे-जे वक्तव्यं करतात, त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.”

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page