सिंधुदुर्ग : आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की, रावण राज्य चालवून हे अयोध्या दौऱ्यावर निघाले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाने म्हटले आहे की, शिवसेनेचे धनुष्य चोरून आणि केलेले पाप धुण्यासाठी म्हणून शिंदे गट अयोध्येला निघाला असल्याचे म्हटले आहे.
तर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीका करताना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि चाळीस आमदार अयोध्येला गेले तरी त्यांनी आज महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास गमावला असल्याची टीका केली आहे.
तर आमदारांना दिलेली मंत्रिपदाची आश्वासने पूर्ण झाली नाहीत त्यामुळे आज 40 पैकी अनेक आमदार चलबिचल झाले आहेत, त्यांना नैराश्य आले आहे.त्यांची मनधरणी करण्यासाठी अयोध्या दौरा काढला आहे. मात्र त्यातील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ज्या आमदारांना घेऊन अयोध्या दौरा केला आहे ते एकत्र राहिले पाहिजेत म्हणून हा अयोध्या दौरा आयोजित केला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अयोध्या दौरा केला असला तरी येणाऱ्या काळात उध्दव ठाकरे यांच्यावरच श्रीराम प्रसन्न होतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवले आहे.