मुंबई : माझ्या आयुष्यात बाळासाहेबांच्या इतकंच शरद पवारांनाही स्थान आहे, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शरद पवार यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल संजय राऊतांनी जाहीर कार्यक्रमात भाष्य केलं आहे. आम्हाला रात्रीच्या काळोखात भेटण्याची गरज नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
कर्जत जामखेड इथं झालेल्या एका पत्रकार संमेलनाला संजय राऊत यांनी हजेरी लावली. यावेळी संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रात्रीच संजय राऊत अचानक शरद पवारांना भेटायला गेले हे खरं आहे का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला.
या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात संजय राऊत म्हणाले, “माझ्या आयुष्यात मी बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकंच शरद पवारांनाही स्थान देतो. मला बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं, या क्षेत्रात उभं केलं. पण शरद पवार माझ्यासाठी आधारस्तंभ आहे. तुम्ही बोलताय तशा गाठीभेटी पवार घेत नाहीत.