देवरुख:- बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका, देवरुख (BAST) ही मान्यताप्राप्त व अधिकृत संस्था असुन बॅडमिंटन खेळाचा प्रसार करण्यासाठी २०१९ पासून संगमेश्वर तालुक्यात कार्यरत आहे.
या संस्थेच्या पहिल्या कार्यकारिणीचा ३ वर्षांचा कार्यकाल नुकताच पूर्ण झाला. नवीन कायकारिणी निवड करणेसाठीची सर्व
साधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये एकमताने नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
यामध्ये असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. मंगेश प्रभुदेसाई यांची पुनर्निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून श्री दिलीप विंचू,सचिव पदी श्री. रविकान्त कदम, खजिनदार श्री राजेश जागूष्टे, सह- सचिव श्री निलेश भुरवणे आणि सदस्य म्हणून सर्वश्री निलेश चव्हाण, संजय पटेल, हरेश पटेल आणि अभिषेक अग्रवाल यांची निवड झाली.
या कार्यकारिणीचा कार्यकाळ पुढील ३ वर्षांचा असेल. नवीन कार्यकारी मंडळाचे बास्ट च्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.