शिर्डी,1एप्रिल : देशाभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 112 वर्षांची परंपरा शिर्डीतील रामनवमी उत्सवाला असल्यानं इथेही रामनवमी मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहात साजरी केली गेली. तीन दिवसीय रामनवमी उत्सवात आलेल्या भाविकांनी साई चरणी भरभरून दान केले. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान तब्बल दोन लाख भाविकांनी साई समाधीच दर्शन घेतलं. तर बाबांच्या झोळीत 4 कोटी 09 लाख रुपयांचं दान भक्तांनी केलं. यात दानपेटी, ऑनलाईन, डीडी, मनीऑर्डर आणि सोने चांदीचा समावेश आहे. तीन दिवसात सुमारे 1 लाख 90 हजार भाविकांनी प्रसादलायत भोजनाचा लाभ घेतला.
परंपरे प्रमाणे यावर्षी देखील राज्यभरातून लहान मोठ्या जवळपास 200 पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या. साधारण 10 दिवसांचा पायी प्रवास करुन या पालख्या रामनवमीच्या एक दिवस आधी शिर्डीत दाखल होतात. रामनवमी उत्सवाला पायी पालख्यांची परंपरा असल्यानं हा उत्सव अतिशय श्रद्धेनं साजरा केला जातो.
साईबाबा हयात असताना बाबांच्या अनुमतीने हा उत्सव उरुस स्वरुपात प्रथम सुरु झाला होता. त्यानंतर बाबांनी श्रीराम जन्म सोहळ्याची