टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पूर्णेकर कुटुंबासाठी नाही! राम पूर्णेकर यांची एकनाथ शिंदेंवर समाजमाध्यमांतून टीका…

Spread the love

ठाण्यात उबाठाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होऊन १९ दिवस उलटले, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. मात्र, मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर शिंदे यांनी तातडीने त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

ठाणे : ठाण्यात उबाठाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या होऊन १९ दिवस उलटले, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतलेली नाही. मात्र, मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्यानंतर शिंदे यांनी तातडीने त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या पार्श्वभूमीवर पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, या प्रकरणातील संशयितांवर कारवाई न झाल्यास दसऱ्यानंतर शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठाण्यात २९ सप्टेंबरला प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. दोन दिवसांपूर्वी राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याबाबत पूर्णेकर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. राजेंद्र शिंदे यांची पोलिसांनी आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली आहे.

https://www.instagram.com/p/DepXVuaIJUE/?xtok=MTluOWNzaWFhcjY0eA==

मात्र, घटना ठाण्यात घडूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतलेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी राम पूर्णेकर यांचे शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणेही करून दिले होते.

दरम्यान, रविवारी मुंबईतील जुहू येथे अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रात्रीच टायगर श्रॉफ याची भेट घेऊन विचारपूस केली आणि कारवाईचे आश्वासन दिले. यावरून राम पूर्णेकर यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. ठाण्यातील पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीसाठी वेळ नसलेल्या उपमुख्यमंत्र्यांना टायगर श्रॉफच्या भेटीसाठी मात्र वेळ मिळतो, अशी टीका त्यांनी केली. ‘याला म्हणतात शिवसेना मीनाक्षी राजा पर्व,’ असा उल्लेखही त्यांनी पोस्टमध्ये केला.

*दसऱ्यानंतर उपोषणाचा इशारा…*

राम पूर्णेकर यांनी या हत्या प्रकरणातील संशयित मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दोघांवर तातडीने कारवाई न झाल्यास दसऱ्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page