
*मुंबई -दि ४ नोव्हेंबर-* जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या सिद्ध पादुकांचे आगमन शनिवार दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. नवघर माणिकपूर साईनगर मैदान, पार्वती टॉकीजच्या मागे, वसई स्टेशन (पश्चिम) येथे संपन्न होणार आहे.
प.पू. जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदुंगाच्या नादात, भजन पथक, कलशधारी सुवासिनी, कोळी नृत्य सादर करणाऱ्या भगिनी अश्या विविध पारंपारिक कलांनी अलंकृत अशी संपन्न होईल.
जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानतर्फे मोफत रक्तदान, देहदान, अवयवदान, विनामूल्य एम्बुलंस सेवा, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, शालेय शिक्षण इ. सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येईल.ŵ
तदोपरान्त सिद्धपादुकांचे षोडशोपचारे पूजन होईल व नंतर भक्तगणांना उपासक दीक्षा दिली जाईल.
यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी उपस्थित भाविकांना ऑनलाइन प्रवचनाद्वारे मार्गदर्शन करतील. मानवी जीवन किती अमूल्य आहे, जीवन सुकर होण्यासाठी आपल्यामध्ये संयम, समयसूचकता, प्रगल्भता, नेतृत्व गुण, खिलाडू वृत्ती, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी हे सर्व गुण भक्तीद्वारे कसे विकसित होतील हे जगद्गुरूश्री समजावून सांगतात. दिवसातून दहा मिनिटे भक्ती करा व स्वप्नातसुद्धा कोणाचे वाईट चिंतू नका हा जगद्गुरूश्रींचा मूलमंत्र आहे. जगद्गुरूश्रींच्या शुभाशीर्वादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…