नवरात्र विशेष लेख- लोवले येथील भजन तारका  ” सुखदा शिंदे “

Spread the love


संगमेश्वर/ अर्चिता कोकाटे- तालुक्यातील लोवले खालचे वाटार येथील प्रतिष्ठित महिला श्रीमती सुखदा संजय शिंदे पूर्वाश्रमीच्या कोंड असुर्डे येथील धार्मिक भजन परंपरा असलेल्या पवार घराण्यातील कै श्री जनार्दन सखाराम पवार पेंटर यांची मुलगी लीना जनार्दन पवार माहेरी असताना पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना सन १९८६ ८७ सालच्या उत्कृष्ट खोखोपट्टू म्हणून राज्यपातळीवरील खेळाडू म्हणून नावलौकिक तसेच घरी आई  निशिगंधा जनार्दन पवार यांनी आपल्या मुलांना भजन करणे तसेच पेटी,  तबला, नाल,  हार्मोनियम वाजवणे असे संस्कार दिले.


       
तसेच काका मुरलीधर व दिलीप बंधू पवार यांचेही तसेच भाऊ हेमचंद्र व कै.श्री रवींद्र यांचे यामध्ये लीना यांना  मार्गदर्शन लाभले.
     

पुढे विवाहानंतर गायनाची आवड असल्याने श्री नीनावी देवी,  श्री गणपती मंदिर,  श्रीराम मंदिर अशा संगमेश्वर परिसरातील विविध मंदिर व मठ येथे जाऊन भजन रुपी सेवा गेली अनेक वर्ष सुखदा ताई करत आहेत.

अंगणवाडी बालसेविका म्हणून लोवले बौद्ध वाडी येथे गेली 25 वर्ष कार्यरत आहेत.
लोवले ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून सन 2019 20 ते 2021 या कालावधीत  पदे भूषवली आहेत.


     

मुली व मुलांचे संगोपन व शिक्षण यामध्ये पती कै. श्री संजय शिंदे यांचे काही वर्षांपूर्वी छत्र हरवल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.यावेळी मुले लहान असताना मुलांवर संस्कार उच्च शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडणे हे ध्येय सुखदा यांच्या डोळ्यासमोर होते.
     

जेष्ठ कन्या स्नेहा हिला ए एन एम नर्स इथपर्यंतचे शिक्षण दिले तर दुसरी कन्या प्रज्ञा हिला एम एस सी बी एड शिक्षण दिले. सध्या ती आटले सप्रे कॉलेजवर शिक्षिका म्हणून कार्यरत तसेच मुलगा आदेश एमएससी पर्यंत शिक्षण घेऊन पोस्ट खात्यात नोकरीला आहे.


    

सुखदा या सध्या लोवले ग्रामपंचायत येथे विविध समित्यांवर कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी स्मरून आई कै निशिगंधा हिने दिलेला भजन साहित्यातील संस्कृतीचा आध्यात्मिक तसेच धार्मिक वारसा जपणे हे ध्येय आहे. यामध्ये अनेक हितचिंतक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन जिवंत प्रवासात लागल्याचे श्रीमती सुखदा संजय शिंदे सांगतात.
        
आदर,  प्रेम, संस्कार,  मनमिळाऊ स्वभाव,  जिद्द व चिकाटी अंगी बांधलेल्या गुणांमुळे त्यांना जन समूह मोठा लाभला आहे.कोकणातील भजन वारसा त्या जपत आहेत.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*

*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page