
रत्नागिरी : ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदींसाह विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जांचा तसेच आढावा घेतला. आज नव्याने दाखल अर्जांचा आढावा घेतला. संबंधित विभागाने मागील प्रलंबित अर्जांसह याची निर्गती करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शेतकरी संघाच्या प्राप्त अर्जावर कार्यवाही करावी. गटविकास अधिकारी चिपळूण, तहसिलदार गुहागर यांनी आलेल्या अर्जाची तपासणी करावी. वस्तुस्थिती पाहून तक्रारींवर कार्यवाही पूर्ण करावी. अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणीच्या अर्जावर कार्यवाही करुन तक्रार निर्गत करावी.