
चिपळूण : कोयना ते पाटणदरम्यान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नदीतून काढण्यात आलेला रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे चिपळूण -कराड मार्गावरील वाहतूक बाधित झाली होती. बुधवारपासून या ठिकाणाहून होणारी वाहतूक तेथील काम पूर्ण झाल्यामुळे तब्बल पंधरा दिवसांनी पूर्ववत करण्यात आली आहे.
चिपळूण-कराड महामार्ग सोमवारी (दि.16जून) सकाळी 11 वाजल्यापासून ठप्प झाला होता. कोयना-पाटण दरम्यान एका पुलाचे काम सुरू असल्याने नदीतून रस्ता काढण्यात आला होता. मात्र, हा रस्ता पाणी येऊन वाहून गेल्याने मार्ग बंद झाला आहे. याचा मोठा परिणाम एस.टी.सह व्यापारावरही होत होता
गेले अनेक दिवस गुहागर-विजापूर मार्गावरील पाटण ते कोयना या रस्त्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. या भागातील सुमारे 12 कि.मी.चा रस्ता खड्डेमय असून, या ठिकाणी सातत्याने अपघातदेखील होत आहेत. मात्र, सातारा राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्याचे काँक्रिटीकरण देखील सुरू आहे.