संघर्ष क्रीडा मंडळाचा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात…

Spread the love

चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण यांच्या वतीने पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने महाराष्ट्र हायस्कूल ते स्विमिंग पूल रस्त्यालगत भव्य वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत व चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या उपक्रमासाठी चिपळूण नगरपरिषदेचे विशेष सहकार्य लाभले.

संघर्ष क्रीडा मंडळ हे केवळ कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमापुरते मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनासारख्या सामाजिक क्षेत्रातही सक्रियपणे काम करत आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात निसर्गप्रेमी कार्यकर्ते भाऊ काटदरे, नयन साडविलकर, सचिव मुन्ना कदम, विकास (भाऊ) पवार, रवी लवेकर, प्रदीप पवार, रुपेश महाडिक, अजित रेडीज, मधुकर पवार, विनोद पवार, बंटी घोरपडे, किशोर भोई, विशाल महाडिक, सनी जाधव, अमोल पवार यांनी हिरिरीने सहभाग घेतला.

तसेच ‘फ्रेंड्स फोरेव्हर ग्रुप’चे बंडोपंत आवले, आप्पा ओतारी, शेखर खेराडे, महेश वेविस्कर, राजा पाथरे, संजय साडविलकर, विरेन कोकाटे, विश्वास खाडीलकर, नितीन नलावडे, परिमल खातू यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमासाठी श्री क्लिनिकल लॅबोरेटरीचे श्री. संजय भागवत यांची विशेष उपस्थिती लाभली.

या वृक्षारोपण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नगरपरिषदेचे श्री. मंगेश पेंढामकर व श्री. बापू साडविलकर यांनी मोलाचे योगदान दिले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page