विश्व समता कला मंच लोवले यांच्यावतीने ‘विश्व समता प्रज्ञा गौरव सन्मान’ करण्यात आले सन्मानित….
संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिनेश आंब्रे यांच्याकडून करण्यात आला सत्कार….

संगमेश्वर प्रतिनिधी/ अर्चिता कोकाटे- संगमेश्वर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि सामाजिक जाणीव असलेले पोलीस हवालदार सचिन कामेरकर यांना ‘विश्व समता कला मंच, लोवळे – संगमेश्वर’ या संस्थेच्यावतीने ‘विश्व समता प्रज्ञा गौरव सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले.
कला व क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष योगदानासंदर्भात देण्यात आला पुरस्कार….
सामाजिक भान राखून सेवा देणारे, नागरिकांशी संवाद साधणारे, मानवतावादी दृष्टिकोनातून काम करणारे पोलीस अधिकारी म्हणून कामेरकर यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या सामाजिक, कला व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांच्या संकल्पनेतून सदरचा पुरस्कार दिनेश आंब्रे यांच्या हस्ते देण्यात आला करण्यात आले.






सन्मान वितरण सोहळ्यात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, तसेच संस्थेचे मार्गदर्शक दिनेश अंब्रे यांच्या हस्ते कामेरकर यांना गौरवपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास पत्रकार खातू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गावित, महिला पोलीस अंमलदार, पोलीस अंमलदार, तसेच सचिन कामेरकर यांचे मित्रमंडळ आणि परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन्मान स्वीकारल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना कामेरकर यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी अभिमानास्पद असून, यामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. सामाजिक कार्याची ही दखल घेतल्याबद्दल मी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो.”
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.

पोलीस व जनता यांच्यातील समन्वयाने प्रश्न सुटतात.- पो.उ.नि. नागरगोजे
पोलीस सेवा करत असतांना बीट मधील जनता व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे चांगल्या हिताचे उत्तम संबध जोपासून नियम,कायदा, या चौकटीतून कित्येक तक्रारी सलोख्यातून सोडवण्यात पो.हे.काॅ.सचिन कामेरकर यांचा हातखंडा किंबहूना सिंहचा वाटा असतो. त्यामुळे लहान,मोठ्या तक्रारी समजावून घेऊन,चर्चेने निर्णायक वळणावर येऊन तात्काळ सोडवतात.असे या सचिन कामेरकर यांची बदली देवरूख येथे झाल्याने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.कामेरकर यांची बदली देवरूख येथे झाल्याने सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नागरगोजे बोलत होते.
यावळी पोलीस स्टाफ मधील अनेक जणांनी कामेरकरांच्या कामगिरी बाबत धाडसीपणा, नेतृत्व निर्णायक गोष्टी याबबत आलेले अनुभव व आठवणी यावर मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बदली निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस स्टाफसह इतर त्यांचे अनेक स्नेही शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

संगमेश्वर तालुका पत्रकार संघ वतीने करण्यात आला सत्कार…
संगमेश्वर पत्रकार संघाच्या वतीने दिनेश हरिभाऊ आंब्रे संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये सचिन कामेरकर यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या वतीने दिनेश अमरे यांनी शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनेश आंब्रे यांनी मनोगत व्यक्त केले.
पो.नि.राजाराम चव्हाण, पो.उ.नि.शंकर नागरगोजे, प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे, नेवरेकर ,धामणीतील श्री समर्थ कृपा ऑनलाईन पी,यु.सी सेंटरचे प्रोप्रा.तसेच वर्गमित्र नंदकिशोर मोहिरे, तांबेडीतून खास मुंबईहून आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.