गरजूंची निस्वार्थ सेवा करा तरच आयुष्यात आनंद लाभेल-भाईनाथ महाराज….धामणी येथे शैक्षणिक साहित्य वाटप दरम्यान आवाहन…

Spread the love

श्रीकृष्ण खातू /धामणी- आपल्या राज्यात असंख्य गरजू विद्यार्थी व त्यांचे पालक असून अशा गरजू,व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गरज असलेल्या शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करत असताना नुकतेच संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील सर्व शाळेतील मुलांना दप्तर वया छत्री कंपास पेटी गणवेश पौष्टिक मध बाटली इत्यादी साहित्याचं वाटप करण्यात आले.

त्यावेळी बोलताना मठाधीश श्री श्री श्री १००८ महंत पीर योगी भाईनाथजी महाराज श्री साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था खोपोली मठाधीश काळभैरव मठ पायधुनी मुंबई म्हणाले की गरजू , गरजवंतांची निस्वार्थ सेवा करा,होतकरूंना पुढे जाण्यासाठी मदत करूया, अनाथांचा नाथ होऊया,व सामाजिक ,शिक्षण सेवा अंगी कारल्यास आपल्याला आयुष्यात निश्चित आनंद व समाधान मिळेल याच शंका नाही. अशा प्रकारचे आवाहन करून  इच्छा व्यक्त केली.

या शैक्षणिक साहित्य वाटपकामी  नऊ दिवसांचा दौरा असून रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,गारगोटी , सातारा ,आळंदी, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील गरजू मुलांच्या काही शाळांना दरवर्षी न चुकता आज *२२ ते २५ वर्षे  *२५९१* गरजू मुलांना अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करून उपक्रम स्वतः राबवत आहेत. शैक्षणिक सेवा ,धार्मिक सेवा, वैद्यकीय सहाय्यता ,नैसर्गिक आपत्ती सेवा, गोरक्षण सेवा, कोराना.  काळात जीवनावश्यक वस्तूंची सेवा अशा प्रकारचा सेवाभाव जपून आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो, व मी सुद्धा या कोकणातीलच असून गरजू होतकरू त्यांची खारीच्या वाट्याप्रमाणे सेवा करण्याची मनोमन इच्छा असून मी स्वतः उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाईनाथ महाराज यांच्या कार्याविषयी उपस्थित उद्योजक प्रभाकर घाणेकर व सेवानिवृत्त शिक्षक अंकुश गुरव यांनी आपल्या मनोगतातून  विस्तृत माहिती दिली. व  अशावेळी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित राहून महाराजांचं कार्य जाणून घ्यावे, आपल्या मुलांना खरंच आवश्यक गोष्टींचा फायदा करून घ्या,व असे गुण जोपासूया ,असे सांगून महाराजांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे शिष्य व भक्तगण, तसेच धामणी हॉटेल श्रद्धाचे मालक प्रभाकर घाणेकर ,सेवानिवृत्त शिक्षक अनंत लिंगायत , अंकुश गुरव, ग्रा.पं. सदस्या स्वाती सप्रे, दीक्षा शिंदे ,प्रेरणा लिंगायत, विश्वनाथ टाकळे, शालेय व्यवस्थापन समिती, चारही शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.

मुख्याध्यापक  व प्रभारी केंद्र प्रमुख धामणी प्रकाश गेल्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले. त्यांनी व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी  उत्तम नियोजन केले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page