जि.प.प्राथमिक शाळा कडवई कुंभारवाडी येथे इयत्ता पहिली प्रवेशोत्सव उत्साहात साजरा…

Spread the love

संगमेश्वर प्रतिनिधी- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई कुंभारवाडी येथे आज दिनांक 16 जून 2025 रोजी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी नाविन्यपूर्ण पद्धतीने  विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल (ठसे घेऊन) शाळेत प्रवेश देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र कदम सर तसेच उपशिक्षक श्री. समाधान पाटील सर यांनी शाळा पूर्व तयारी सुंदर पद्धतीने केली होती. वर्ग सजावट, रांगोळी, फलक लेखन, रंगीबेरंगी फुगे,विविध प्रकारचे संदेश देणारे बॅनर लावले होते.

या प्रवेशोत्सवासाठी मा.शिक्षण विस्तार अधिकारी श्री.प्रवीण पवार सर तसेच अंगणवाडी सुपरवायझर सौ.नरोटे मॅडम प्रशासकीय अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. तसेच न्यूज रिपोर्टर श्री. दीपक तुळसणकर अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा, उपाध्यक्षा, सर्व सदस्य तसेच सर्व पालक, गावातील नागरिक उपस्थित होते. पहिल्याच दिवशी मोफत गणवेश वाटप तसेच शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोड खाऊ पदार्थ देण्यात आले.

मा विस्तार अधिकारी शिक्षण श्री. प्रवीण पवार सर, अंगणवाडी सुपरवायझर सौ. नरोटे मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सोनाली कुंभार मॅडम, न्यूज रिपोर्टर श्री. दीपक तुळसणकर यांनी सर्व नवागतांना आपल्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री रवींद्र कदम सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page