चिपळूण शहरात शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्साहात सुरुवात,’पहिले पाऊल’ उपक्रमात नवागतांचे स्वागत…

Spread the love

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत; गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तकांचे वाटप

चिपळूण- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात आज चिपळूण शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याहस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. शाळेच्या नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसोबत काढण्यात आलेल्या प्रभात फेरी आणि शिक्षणाची पालखी या उपक्रमांमधून करण्यात आली.

नवागत विद्यार्थ्यांसाठी ‘पहिले पाऊल’ या विशेष संकल्पनेअंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या बालगोपाळांच्या पायाचा ठसा कागदावर घेण्यात आला व त्याची प्रत त्यांच्या पालकांना देण्यात आली. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस उत्सवासारखा साजरा करत स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख बापू सडविलकर, स्थानिक नागरिक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांचे स्वागतपर संदेश आणि पालकांची समाधानकारक प्रतिक्रिया यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशीचा आनंद द्विगुणित झाला. शिक्षणाचा नवीन टप्पा एक सणासारखा साजरा करत चिपळूण शहरात नववर्षाचे शैक्षणिक पर्व आज सुरू झाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page