इस्रायलचा इराणच्या सरकारी न्यूज चॅनलवर बॉम्बहल्ला; जीव वाचवण्यासाठी बुलेटीन सोडून अँकर पळाली….

Spread the love

तेहरान- इस्रायलकडून इराणमधील वेगवेगळ्या ठिकाणांवर सतत बॉम्बफेक केली जात आहे. आज सोमवारी इस्रायलनं मध्य, पूर्व आणि पश्चिम इराणमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य करत बॉम्बहल्ले केले. तेहरानमध्ये तर थेट प्रक्षेपण सुरू असताना सरकारी वृत्तवाहिनीच्या मुख्यालयावरही बॉम्ब टाकण्यात आले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक महिला अँकर बातमी सांगत असतानाच मोठा स्फोट होतो आणि ती स्वतःचा जीव वाचवून पळताना दिसत आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराणने आज इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि प्रमुख बंदर असलेल्या हाइफा या दोन मोठ्या शहरांवर हल्ला केला. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून देखील तेहरानवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये इस्रायलने इराणच्या सरकारी चॅनलच्या कार्यालयाला लक्ष केलं. बुलेटीन सुरू असतानाच हा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर बातमी वाचत असलेल्या अँकवर तेथून पळण्याची वेळ आली. याचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.

इस्रायलने इराणवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. इराणच्या सरकारी चॅनलचं कार्यालय इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आलं, याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, बुलेटीन सुरू आहे. बातम्या वाचल्या जात आहेत, त्याचदरम्यान त्या ठिकाणी मोठा हल्ला झाला. हल्ला होताच अँकर तेथून पळाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान इराणकडून आता युद्धविरामाचे संकेत देण्यात आले आहेत.  इराणच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थांमार्फत अमेरिका आणि इस्रायला संदेश पाठवला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट देखील घातली आहे, की जर इस्रायलने हल्ले थांबवले तर आम्ही देखील तातडीनं सैन्य कारवाई थांबवू असं इराणने म्हटलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page