पूर परिस्थिती : संगमेश्वर पोलिसांची आणि पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांची प्रशंसनीय  कामगिरी लोकांकडून करण्यात येत आहे कौतुक….

Spread the love

संगमेश्वर :अर्चिता कोकाटे / नावडी- सध्या संगमेश्वर परिसरामध्ये पूर परिस्थिती व दरड कोसळणे इत्यादी घटना घडत असताना धामणी येथील सनराईस हॉटेल जवळील नजीकच्या पुलाजवळील नदीपात्रातून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस अंमलदार सचिन कामेरकर,  विनय मनवल, सतीश कोलगे,  गिरजाप्पा लोखंडे, उत्तम सासवे यांनी जीवाची बाजी लावून मनुष्यहानी होऊ नये म्हणून तेथील पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.


       
पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्याकडून कौतुकास्पद कामगिरी…

याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे,  नैसर्गिक आपत्ती,  दरड कोसळणे इत्यादी घटना घडत आहेत,  अशा अप्रिय घटना घडलेल्या ठिकाणी कसबा,  गोळवली, कुंभार खाणी, रामपेठ आठवडा बाजार अशा विविध ठिकाणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळांना भेटी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधिकारी शंकर नागरगोजे व पोलीस अंमलदार  होते.


      
पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत सेवेमध्ये तत्पर…

पो. नि.राजाराम चव्हाण यांनी रात्री अपरात्री पाणी भरल्यास कोणती आपत्ती आल्यास मनुष्यहानी होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. ही कामगिरी पो.नी.राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सकाळी पाणी भरल्याने रामपेठ संगमेश्वर परिसर मध्ये स्वतः पायी हजर राहून लोकांना सहकार्य व सूचना केल्या. पाण्याची पातळी वाढत असल्याने गाडीमधून फिरून स्वतः अलाउंसिंग करून लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. त्यानंतर स्वतः अनेक ठिकाणी जाऊन लोकांना सहकार्य केले. संध्याकाळी शास्त्री फुल येथे दरड कोसळल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि संबंधितांना पोलीस स्टेशनला बोलून मार्गदर्शनही केले. आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक यांचे कौतुक करण्यात येत आहे.


        

शाळेचा पहिला दिवस असल्याने अनेक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी व्यवस्थित घरी पोहोचलेत की नाही याची केली चौकशी…

आज शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस आणि पावसाची दमदार हजेरी,  संगमेश्वर, कसबा येथे पूर परिस्थिती असल्यामुळे पोलीस अधिकारी शंकर नागरगोजे यांनी पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि इतर प्रशालेमध्ये   प्रत्यक्ष भेट देऊन तेथील विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचले आहेत की नाहीत याची माहिती  घेतली.  शाळांना त्यांनी  भेट दिली त्याबद्दल शिक्षकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. अगदी बारीक बारीक विषयांमध्ये संगमेश्वर पोलीस स्टेशन लक्ष देऊन काम करत होते. त्यामुळे सगळ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
      
नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page