दापोली उप रुग्णालय येथील लिफ्ट साठी काढलेल्या खड्ड्यात बुडून बालकाचा मृत्यू….

Spread the love

दापोली : शहरातील उपजिल्हा रुग्णालयच्या आवारात नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीमधील लिफ्टसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात बुडून एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला .

ही घटना १२ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत चव्हाण (४० , रा. मंद्रुप, सेवालाल नगर तालुका, जिल्हा सोलापूर) हा दापोली येथे कामानिमित्त आला आहे. तो जेसीबी चालक तसेच मजुरीचे काम दापोली शहरात व परिसरात करत असतो. १२ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तो दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोफत जेवणाची सुविधा असल्याने तिथे आपले दोन मुलगे राजेश श्रीकांत चव्हाण (४ ) आणि समीर श्रीकांत चव्हाण (६ ) या दोघांना घेऊन जेवण घेण्यासाठी आला होता. श्रीकांत चव्हाण हा जेवण घेण्यासाठी मिळणाऱ्या ठिकाणी गेला आणि त्याची दोन मुले बाजूलाच असलेल्या शेडमध्ये खेळत होती. यादरम्यान समीर श्रीकांत चव्हाण हा मुलगा खेळताना दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या ठिकाणी गेला. तेथे या इमारतीच्या लिफ्टसाठी खड्डे खोदून ठेवलेले होते. त्यामध्ये पाणी भरलेले असल्याने तो खेळताना त्या खड्यामध्ये पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान श्रीकांत चव्हाण हा आपल्या मुलाला शोधत असताना या बांधकामावर कामासाठी म्हणून असलेला जुगनू शर्मा लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयातून पाणी काढण्यासाठी आला असताना त्याला त्या खड्यामध्ये लहान मुलांच्या चपला आढळून आल्या. याच दरम्यान श्रीकांत चव्हाण हा आपल्या मुलाला शोधत आहे , हे त्याला समजले. त्यानंतर पाण्यात उडी घेऊन त्याने त्या लहान मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला असता आतमध्ये बालक बुडालेले आढळून आले. या घटनेची माहिती कळताच दापोली तालुक्याच्या तहसीलदार बोंबे यांनी घटनास्थळी पाहणी केली. दापोलीचे पोलिस निरीक्षक अहिरे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page