सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी अपघातग्रस्त विमानात सिनियर क्रु-मेंबर!…

Spread the love

रायगड  :अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा अमोल महाडिक या सिनियर कु-मेंबर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या मुंबईत गोरेगांव येथे महाडीक यांच्या घरी पोहोचल्या असून पूढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
     

या विमानामध्ये एकूण १२  क्रू मेंबर्स होते, यापैकी एक अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांची पत्नी आहे. तसेच क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह १ , दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह २ , इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील आणि मनीषा थापा अशी इतर क्रू मेंबर्सची नावे आहेत. दरम्यान अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI171 या विमानाचा भीषण अपघात झाला.
     

टेकऑफनंतर अवघ्या काही सेकदांमध्ये ही दुर्घटना घडली. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने तातडीने उपाययोजना करत अपघातग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबीयांना आणि संबंधितांना माहिती देण्यासाठी एक विशेष हॉटलाइन सेवा सुरू केली आहे. 1800 5691 444 हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, या क्रमांकावर संपर्क साधून अपघाताविषयी अधिकृत माहिती तसेच प्रवाशांच्या सद्यस्थितीबद्दल अद्ययावत माहिती मिळवता येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page