शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीने कुटुंब दत्तक कार्यक्रम आयोजन…

Spread the love

*रत्नागिरी-* शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली जनऔषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख व सहाय्यक प्राध्यापक डॉ.पूजा रॉय व वरिष्ठ निवासी डॉ. अन्नेपु पूर्णा चंदू यांनी कुटुंब दत्तक कार्यक्रम व वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन केले.तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथील डॉ. कुलकर्णी व आरोग्य सहाय्यक गणेश वाघ यांच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव येथील आरोग्य शिबिरामध्ये सहकार्य करण्यात आले.

‘कुटुंब दत्तक कार्यक्रम’ हा नॅशनल मेडिकल कमिशन ( NMC ) च्या मार्गदर्शक सूचनानुसार वैद्यकीय शिक्षणात “समुदायाशी प्रत्यक्ष सहभाग” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक अभिनव उपक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत एमबीबीएस पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील विशिष्ट कुटुंबे दत्तक घेऊन त्यांचे आरोग्य, सामाजिक व कौटुंबिक पैलू समजून घेऊन आरोग्य शिक्षण,सल्ला आणि प्राथमिक सेवा देणे अपेक्षित असते या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आहे.

ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव या गावाची ‘कुटुंब दत्तक कार्यक्रम’ यासाठी निवड करण्यात आलेली असून प्रत्येक विद्यार्थी पाच कुटुंब दत्तक घेणार असून सदर भेटीमध्ये रुग्णांची जीवनशैली, आहार स्वच्छता , माता व बाल आरोग्य विषयक निरीक्षण, दैनंदिन सवयी , व्यसनाधीनता , मानसिक आरोग्य अभ्यास, लसीकरण स्थिती तपासणी व सल्ला याबाबत गृहभेटीवेळी माहिती घेऊन रुग्णांना सहाय्य करण्यात येणार आहे.
ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव येथे आयोजित केलेल्या वैद्यकीय आरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सहकार्य केले. सदर कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव सरपंच फरीदा काझी , ग्रामसेवक उल्हास कोळी , ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page