शास्त्री नदीला येणाऱ्या पुराच्या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने शास्त्री नदीपात्रात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके ….

Spread the love

संगमेश्वर/नावडी :अर्चिता कोकाटे – संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीला दरवर्षी पूर येतो. येणाऱ्या पुरा मधून संगमेश्वर वासीयांचे दरवर्षी नुकसान होते. त्या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. येणाऱ्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. पूर परिस्थितीमध्ये लोकांची मदत कशी करायची, असलेल्या साधनांचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

संगमेश्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके…

संगमेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने मार्फत एक चांगला उपक्रम राबवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संगमेश्वर पाग आळी जवळील गद्रे वखार समोरील ( गणपती घाट )शास्त्री नदीपात्रात दि. 9 जून 2025 रोजी संध्याकाळी पाच ते साडेसहा यावेळी पावसाळी काळात पूर परिस्थिती नैसर्गिक आपत्ती आल्यास मनुष्यहानी, प्राणी हानी होऊ नये याकरिता नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने मॉक ड्रिलचे आयोजन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


     
नैसर्गिक आपत्ती आल्यास कशाप्रकारे हाताळावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बोट चालवणे, घरातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून पूर परिस्थितीमध्ये स्वतःला कसे वाचवता येऊ शकते याबद्दल प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.       

पूर परिस्थितीत स्वतःला कसे वाचवता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सदर मॉक ड्रिल करिता दोन पोलीस अधिकारी, 10 पोलीस अंमलदार, 6 होमगार्ड, नावडी येथील आठ पोहणारे सदस्य,  ग्रामपंचायत नावडीचे पाच कर्मचारी आदी उपस्थित होते व नागरिक होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page