
अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती AP या वृत्तसंस्थेने दिली आहे.विमान अपघातात सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचा दावा…
अहमदाबाद गुजरात गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. अहमदाबाद विमान अपघातात सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती AP या वृत्तसंस्थेने दिली आहे. या भीषण दुर्घटनेत आगीमुळे मृतदेह जळाले आहेत. त्यामुळे मृतांची ओळख पटविणे कठीण झाले आहे.
अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती…
या विमान अपघाताबाबत अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘अपघातग्रस्त एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानात कोणीही वाचले नसल्याचे दिसून येत आहे. एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करत होते. ते लंडनला जाणार होते. मात्र, टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच विमानाला एका निवासी भागात अपघात झाला. या विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते.’
इमारतीवर आदळल्याने विमान कोसळले…
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, आकाशात धुराचे लोट दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान एका इमारतीवर आदळले, ज्यामुळे हा अपघात घडला. आता या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या देशाचे किती प्रवासी?…
एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पायलटचे नाव काय? किती होता अनुभव?…
समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमित सभरवाल आहे. सुमित यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तसेच या विमानाच्या सह-वैमानिकाला ११०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच ते विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.

🔹️विमान अपघातातील महत्त्वाच्या अपडेट…
▪️अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले आहे. विमानातील सर्व २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात पोलिस आयुक्तांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एपीने ही माहिती दिली.
▪️विमानात २३० प्रवासी होते. यामध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाचा समावेश होता. उर्वरित १२ जण क्रू मेंबर्स होते.
▪️अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह इतके जळालेले आहेत की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.
▪️या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. भाजपचे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी एक्स वर ही माहिती दिली. तथापि, काही वेळाने त्यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली.
▪️ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर राहतात. माहितीनुसार, १५ डॉक्टर जखमी झाले आहेत.
▪️एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-171 दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले. ते दुपारी १:४० वाजता कोसळले.
▪️मिळालेल्या माहितीनुसार, विमान विमानतळाच्या भिंतीजवळ आणि एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले. विमान पडताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले.




विजय रुपाणी यांचा विमानातील शेवटचा फोटो…

2020 मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान कोसळले, 21 जणांचा मृत्यू
7 ऑगस्ट 2020 रोजी केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून कोसळले. यामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 110 जण जखमी झाले. कोरोना काळात वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून भारतीयांना आणले जात होते.

2020 मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान कोसळले, 21 जणांचा मृत्यू
7 ऑगस्ट 2020 रोजी केरळमधील कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान धावपट्टीवरून घसरून कोसळले. यामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 110 जण जखमी झाले. कोरोना काळात वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून भारतीयांना आणले जात होते.
*
अपघातातून वाचलेला रमेश म्हणाला – जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला फक्त मृतदेह दिसले…
अपघातातून वाचलेला रमेश विश्वास कुमार म्हणाला की, उड्डाणानंतर ३० सेकंदांनी विमान प्रचंड आवाजात कोसळले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्याभोवती मृतदेह होते. विमानाचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते. कोणीतरी मला उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. माझा भाऊही माझ्यासोबत विमानात प्रवास करत होता. कृपया त्याला शोधण्यात मला मदत करा.
विमानाची टेल विंग वसतिगृहाच्या आवारात आहे….
अहमदाबादमधील डॉक्टर्स हॉस्टेलवर एअर इंडियाचे विमान आदळले. येथे विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला आहे. व्हिडिओमध्ये वसतिगृहाच्या आवारात विमानाची टेल विंग तुटलेली दिसत आहे.