
संगमेश्वर :अर्चिता कोकाटे /नावडी- कसबा शास्त्रीपूल (पारकरवाडा) येथील जेष्ठ पत्रकार वहाब दळवी यांचे बंधू अस्लम दळवी यांचे सुपुत्र आसीम दळवी यानी वैद्यकिय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून डाॅक्टर होण्याचा मान मिळवला. त्या निमित्ताने नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगांवकर व पत्रकार दिनेश अंब्रे यांनी यथोचित सत्कार केला.

यावेळी प्रमुख अतिथी संगमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, गुप्त पोलीस अंमलदार किशोर जोयशी ,हन्नफी जमातीचे अध्यक्ष अल्लीखान, जेष्ठ सदस्य अशरफ शहा,इलियाज मापारी, शाफई जमातीचे माजी अध्यक्ष हनिफ खलफे उपस्थित होते.