लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; नितेश राणेंचा रोख कुणाकडे?…

Spread the love

भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे धाराशिवमधील कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित होते. तेव्हा सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसवला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा असे वक्तव्य केले आहे. त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे.

धाराशिव/ प्रतिनिधी- सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे विधान भाजप नेते नितेश राणे यांनी केले आहे. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्याने शिवसेनेला इशारा दिला आहे. कुणी कितीही ताकद दाखवली तरीही देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचे लक्षात ठेवा, असेही राणे यांनी वक्तव्य केले.

धाराशिवमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याला नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे यांनी अन्य पक्षांवर घणाघात केला. भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून लक्ष घाततील असे नितेश राणे म्हणाले.

धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना इशारा दिला. ‘कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरीही सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा. फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही,’ असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.

भाजप आणि शिवसेना यांच्या धाराशिवमध्ये सुप्त संघर्ष आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन दोन्ही पक्षात संघर्ष असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे मंत्री असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page