विद्यार्थ्यांनी आवड आणि योग्य मार्गदर्शन लक्षात घेऊनच करावा अभ्यासक्रमाचा निवड: लीला बिरादार यांचा सल्लाचिपळूण भाजपच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न..

Spread the love

चिपळूण, वार्ताहर : “१० वी नंतर कोणता अभ्यासक्रम घ्यायचा याचा निर्णय घेताना केवळ मित्र-मैत्रिणींच्या मागे न लागता स्वतःची आवड, अभ्यासाची प्रगती आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊनच निवड करावी. अनुभवी व्यक्तींचं मार्गदर्शन घेतल्यास पुढील शिक्षण सोपं होतं,” असा महत्वाचा सल्ला डीबीजे महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्य सौ. लीला बिरादार यांनी दिला.

भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर मंडळाच्या वतीने परशूराम नगर, राधाकृष्ण नगर आणि रावतळे परिसरातील १०वी व १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

या वेळी व्यासपीठावर महिला जिल्हा अध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, विद्या क्लासेसच्या संचालिका सौ. अमृता जोशी, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, प्रणाली सावर्डेकर, साईनाथ कपडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना “आपल्याला झेपेल का?”, “तो कोर्स भविष्यात रोजगार देईल का?” याचा गांभीर्याने विचार करावा, तसेच तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात संगणक क्षेत्रातील संधींचाही अभ्यास करावा, असे अमृता जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

या सोहळ्यात रामदास राणे, शशिकांत मोदी, विजय चितळे, निनाद आवटे यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली सावर्डेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अश्विनी पवार यांनी केले.

या सोहळ्यात एकूण ५४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

चिपळूण भाजपचा प्रत्येक प्रभागात असे सत्कार समारंभ आयोजित करण्याचा मानस आहे.

या वेळी विनोद भोबसकर, अभय चितळे, शीतल रानडे, सारिका भावे, रत्नदीप देवळेकर, अनिल सावर्डेकर, मधुकर निमकर, पूनम काजारी, श्रद्धा कदम, शक्ती चव्हाण, अभिषेक राजापूरकर, ज्ञानेश्वर नलावडे आदी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page