चिपळूण नगर परिषदेचा ‘वाचू आनंदाने’ उपक्रमवाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उद्या सकाळी दोन तास वाचन…

Spread the love

चिपळूण : चिपळूण नगर परिषद, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय मंदिर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ‘वाचू आनंदाने’ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत निसर्गरम्य ठिकाणी दोन तास फक्त मराठी पुस्तकांचे वाचन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील वाचकांसाठी हा उपक्रम खुला असून, मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाचा पुढील कार्यक्रम रविवार, दि. ८ जून २०२५ रोजी सकाळी ८.०० वा., लोकमान्य टिळक वाचनालय, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.
चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम शहरात सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 प्रसाद (बापू) साडविलकर, उद्यान विभाग प्रमुख – 9764610907
📞 मंगेश पेढांबकर, प्रशासकीय अधिकारी – 8380964532

📌 टिप – कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांनी आपले पुस्तक सोबत आणावे किंवा आयोजकांकडून पुस्तक दिले जाईल. मोबाईल घरी ठेवून शांत वाचनाचा आनंद घ्यावा.
हा उपक्रम वाचनसंस्कृतीस चालना देण्याबरोबरच एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा ठरतो आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page