सेवानिवृत्त व्यक्तीला ऑनलाईन गंडा ; क्रेडिट कार्डच्या नावाखाली फसवणूक…

Spread the love

चिपळूण : लाईफटाईम क्रेडिट कार्डच्या नावाखाली एका ७२  वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला ६  लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हरी बापट (वय ७२, रा. परांजपे स्कीम, चिपळूण) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बापट यांच्या तक्रारीनुसार, २० मार्च २०२५ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे ही घटना घडली.

बापट यांचे आयडीबीआय बँक, चिपळूण शाखेत संयुक्त खाते आणि बचत खाते आहे. १९ मार्च २०२५  रोजी फेसबुकवर लाईफटाईम क्रेडिट कार्डची जाहिरात पाहून त्यांनी फॉर्म भरला होता. दुसऱ्याच दिवशी २० मार्च रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि क्रेडिट कार्ड हवे आहे का, असे विचारले. बापट यांनी त्या व्यक्तीला त्यांच्या एटीएम कार्डची माहिती आणि गोपनीय पिन क्रमांक दिला. त्यानंतर, त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचा संदेश त्यांना बँकेकडून मिळाला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्यांच्या बचत खात्यातील आणि मुदत ठेवीतील एकूण ६ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोन अज्ञात मोबाईल क्रमांकांच्या धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page