३४ वर्षांच्या निष्कलंक शासकीय सेवेनंतर राजेंद्र भानजी सेवानिवृत्त जैतापूरातील मित्रपरिवाराने दिल्या शुभेच्छा….

Spread the love

राजापूर / प्रतिनिधी –३४ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि निष्कलंक शासकीय सेवेनंतर, राजेंद्र भानजी दिनांक ३० मे रोजी नियत वयोमानानुसार सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खालील महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पार पाडली.

६ वर्षे विधानसभा विभागात,१५ वर्षे उपमुख्यमंत्री कार्यालयात,६ वर्षे प्रधानसचिव, विधानसभा यांचे स्वीय सहायक म्हणून,४ वर्षे अध्यक्ष, पंचायत राज समिती यांचे स्वीय सहायक म्हणून,३ वर्षे अध्यक्ष, इतर मागासवर्ग समिती यांचे स्वीय सहायक म्हणून सेवा बजावली आहे.

या संपूर्ण सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि नम्रतेने कार्य केले. सहकाऱ्यांमध्ये त्यांचा स्नेह, वरिष्ठांमध्ये विश्वास आणि जनतेमध्ये आदर असे स्थान कायम राहिले.

राजेंद्र भानजी यांचे शालेय शिक्षण राजापूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल जैतापूर या प्रशालेत झाले.
अत्यंत गरिबीत बालपण गेलेल्या भानजी  यांनी आपल्या सेवाकाळात अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक शाळा तसेच संस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले आहे.

वेंगुर्ला आरवली येथील मूळ रहिवासी असलेले राजेंद्र भानजी यांची नाळ पूर्वीपासूनच राजापूर तालुक्यातील जैतापूर विभागाशी जोडली गेलेली आहे.


नियत वयोमानानंतर सेवानिवृत्त झालेल्या राजेंद्र भानजी यांना विधानसभा विभागातील वरिष्ठ, त्याचबरोबर सर्व सहकारी आणि जैतापूर परिसरातील  मित्रपरिवारने शुभेच्छा दिल्या आहेत

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page