कळंबुशीतील ग्रामपंचायत नवीन इमारतीचा गणेश पूजन सोहळा झाला संपन्न,अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विधीवत करण्यात आले पूजन….

Spread the love

श्रीकृष्ण खातू /धामणी- संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी  येथील ग्रामपंचायत नवीन इमारतीसाठी मा. खासदार विनायक राऊत यांनी जनसुविधा योजनेतून पंधरा  लाख रुपये इतका निधी मंजूर केला होता. सदर इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे चालू होते.आता ते बांधकाम पूर्णत्वास गेल्याने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ,ग्राम प्रमुख, गावकर ,ग्रामस्थ      इत्यादींच्या नियोजनाने व सहकार्याने  गणेश पूजन करण्यात आले. व इमारत प्रवेश सुरू झाला.

   
तसेच दुसऱ्या टप्प्यात काही शिल्लक काम व सभागृह या कामासाठी पालकमंत्री उदयजी सामंत यांनी जनसुविधा सन२०२४/२५ मधून दहा लाख रुपये निधी मंजूर केले आहेत . व त्याप्रमाणे सभागृहाचे काम सद्ध्या  चालू आहे.

   
या गणेशपूजन सोहळ्यासाठी सरपंच सचिन चव्हाण,      ग्रामप्रमुख सुमित चव्हाण, मोहनराव (बापू ) चव्हाण, सदस्य       दिनेश चव्हाण ,अंजली चव्हाण, सायली चव्हाण, सुश्मिता काजवे, मधुरा आग्रे, महेश घाणेकर गावकर सुरेश काजवे, आत्माराम म्हापरले,ग्रामसेवक संदीप शेडगे, व कर्मचारी, तसेच गावातील   ग्रामस्थ शाळेतील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page