मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सवर दणदणीत विजय; लखनौचा लाजिरवाण पराभव…

Spread the love

*मुंबई-* आयपीएल 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पांड्याच्या संघाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने चांगली कामगिरी केली आणि लखनौ सुपर जायंट्सचा एकतर्फी 54 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि रायन रिकेल्टन यांच्या शानदार अर्धशतकांनंतर, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विल जॅक्स यांच्या धारदार गोलंदाजीमुळे हा विजय निश्चित झाला. यासह, मुंबई आयपीएलमध्ये 150 विजय नोंदवणारा पहिला संघ बनला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ संघाला फक्त १६१ धावा करता आल्या. लखनौचा हा १० सामन्यांतील पाचवा पराभव आहे. लखनौ संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. मुंबईने दिलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना लखनौची सुरुवात चांगली झाली नाही. एडेन मार्क्रमला फक्त ०९ धावा करता आल्या. यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी जलद धावा काढल्या. लखनौने पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात ६० धावा केल्या होत्या पण त्यानंतर संघाने आपली लय गमावली आणि नियमित अंतराने विकेट गमावल्या.

मिचेल मार्श २४ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. १५ चेंडूत २७ धावा काढून निकोलस पूरन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि तीन षटकार आले. पुन्हा एकदा कर्णधार ऋषभ पंतची बॅट शांत राहिली. तो फक्त ०४ धावा करू शकला. आयुष बदोनीने २२ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. डेव्हिड मिलरला १६ चेंडूत फक्त २४ धावा करता आल्या. अब्दुल समदही स्वस्तात बाद झाला. तो दोन धावा करून बाद झाला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ४ षटकांत २२ धावा देत ४ बळी घेतले. विल जॅक्सने दोन विकेट घेतल्या. जॅकने पूरन आणि पंत यांचे बळी घेतले. ट्रेंट बोल्टने २० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. मुंबईकडून सर्वाधिक धावा रियान रिकेल्टन आणि सूर्यकुमार यादवले केल्या. रियान रिकेल्टन ५८ धावा केल्या तर सूर्याने ५४ धावा केल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page