
संगमेश्वर/ श्रीकृष्ण खातू- १९५० रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. एकविसाव्या शतकातील सामान्यांचे जीवन समाधानी तसेच निरोगी होण्यासाठी एक प्रकारचे मानसिक संतुलन राखून निरोगी शरीरात निरोगी मन हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रथम शरीर (आरोग्य) निरोगी असायला पाहिजे.




तमाम जनतेच्या आरोग्या साठी सेवा करणारे,डाॅक्टर, आरोग्य सेविका, परिचारिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, अशा अनेक व्यक्तींना या दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेट्ये, जेष्ठ नागरिक भिकाजी (भाऊ )साळवी, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगांवकर, सामाजिक कार्यकर्ते अर्चिता कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, श्रीकृष्ण खातू यांच्या वतीने रामपेठ अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे, मदतनीस शीतल अंब्रे, नावडीतील डाॅ. पवन भांड,डाॅ.हेमलता माने, डाॅ. सादिक मुकादम,ग्रामीण रूग्णालय संगमेश्वर येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ. अभिजित मोरे, परिचारिका, कर्मचारी, आशा सेविका, वृषाली मुरकर,अनिता सुर्वे आदी मंडळींनि पुष्पगुच्छ व वाचनीय पुस्तके भवसागर सेतू, ब्रह्मज्ञान, हसती दुनिया, अंधाराकड प्रकाशाकडे अशी पुस्तके देऊन यथोचित सन्मान .करून शुभेच्छा देण्यात आल्या.