![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2025/01/1001003635.jpg)
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे टीम इंडियात १४ महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे.
या मालिकेत टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याचे पुनरागमन झाले आहे. शमी इंग्लंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनाही टीम इंडियात स्थान मिळाले आहे.
अक्षर पटेल उपकर्णधार-
अक्षर पटेलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग देखील टीम इंडियाचा भाग आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग , मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
स्पिनर वरुण चक्रवर्ती, सुंदर आणि बिश्नोई …
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. भारताने वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई या घातक फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. वॉशिंग्टन सुंदर देखील टीम इंडियाचा एक भाग आहे. रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि हर्षित राणा यांनाही स्थान मिळाले आहे.
शुभमन-पंत आणि यशस्वी संघाबाहेर …
बीसीसीआयने शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना ब्रेक दिला आहे. हे दोन्ही खेळाडू T20 संघाचा भाग नाहीत. पण वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतात. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. यशस्वी जैस्वाल देखील टी-20 टीम इंडियाचा भाग नाही.
विशेष म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज शनिवारी (११) रात्री फक्त टी-20 साठी संघाची घोषणा केली. एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल. शमी बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. पण आता तो परतला आहे.
दुखापतीनंतर शमी क्रिकेटपासून दूर होता. मात्र त्याने अलीकडे देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता टीम इंडियामध्ये सहभागी झाला आहे.