संगमेश्वर प्रतिनिधी- संगमेश्वरातील साप्ताहिक पोलीस तपासचे वरिष्ठ पत्रकार (महाराष्ट्र राज्य) दिनेश हरिभाऊ अंब्रे यांनी पत्रकार दिनानिमित्त विविध उपक्रम घेतले,जि.प.केंद्रशाळा संगमेश्वर नं.२ ,कोंड असुर्डे नं.२ लिटील स्टार प्रि.स्कूल, लिटील एंजल प्रि.स्कूल, येथे इ.तिसरी ते पाचवी पर्यत व त्या खालील मुलांसाठी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.
हसरी दुनिया उपयुक्त २५ पुस्तके रामपेठ अंगणवाडी,नावडी अंगणवाडी, संभाजी नगर अंगणवाडी तसेच संगमेश्वर नं.२ व कोंडी असुर्डे नं.२ येथे पुस्तके वाटप करण्यात आले.या उपक्रमास मुख्याध्यापिका भिडे,शिक्षिका रत्नप्रभा शेरे, जाधव, मुख्याध्यापक पंडीत ,शिक्षिका पवार,अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे, मदतनीस शितल अंब्रे, शितल रहाटे, मनिषा जाधव,यांनी धन्यवाद दिले. व पत्रकार दिनानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.