शास्त्रीपूल (वहाब दळवी) – रत्नागिरी जिल्हयातील राजापूर आणि वैभववाडी तालुक्यातून कोल्हापूर, सांगलीला जाण्यासाठी सोय व्हावी,यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्गाची मागणी गेल्या २५ वर्षा- पासून होत आहे. याबाबत पोकळ आश्वासनेच दिली जात आहेत. प्रत्यक्षात याकडे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मात्र दुर्लक्षच होत आहे. वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग झाला तर चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, लांजा, पाली या सर्व तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कोल्हापूर, सांगली , तासगांव या ठिकाणी पिकणाऱ्या द्राक्ष , डाळिंब, पेरु,फ्रुट आदी फळपिकासह भाजीपाला, कोकणासह मुंबई पर्यंत बाजारपेठेत पाठविण्याची चांगली सोय होणार आहे. माल वाहतुकीसह अन्य विकासात्मक बाबींना चांगल्या उपयोग होणार आहे.
रेल्वे मार्गामुळे छोटे-मोठे व्यवसाय वाढून नव्या बाजारपेठा विकसित होण्यास मदतही होणार आहे. आर्थिक उलाढाल, रोजगारवाढीलाही – चालना मिळणार आहे. रेल्वे मार्गावर होणाऱ्या रेल्वे, स्थानकांच्या परिसरात जागांचा व्यावसाथिक विकास होईल. त्यांच्या किमती वाढून थेट लाभ स्थानिक शेतकयांना होईल,वैभववाडी तालुक्यासह अन्य तालुक्यातील नागरिकांच्या व भाविकांच्या मागणीच्या अनुषंगाने माजी रेल्वे मंत्री मा.सुरेश प्रभु वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी- कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी हि दिली होली.मात्र अद्याप सर्वेक्षण का झाले नाही, आजही अनुत्तरितच आहे. त्यानंतर हा प्रश्न केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा निर्विवादसत्ता आली. केंद्रिय रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी- कोल्हापूर या रेल्वे मागच्या सर्वेक्षणाचे काम त्वरित पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी. आणि रेल्वेमागचि काम मार्गी लावावे. अशी मागणी प्रवासी, नागरिकांतून जोर धरू लागली आहे.