पैसा फंड स्कूलची शैक्षणिक सहल आनंदात संपन्न..

Spread the love

संगमेश्वर : दिनेश अंब्रे – पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेची यावर्षीची शैक्षणिक सहल अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडली.यावर्षीची इ.8 ते 10 वी ची शैक्षणिक सहल  दि.27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या मद्ये तुळजापूर,  भुईकोट किल्ला, अक्कलकोट, सोलापूर, पंढरपूर, कैकाडी महाराजांचा मठ,गोंदवले,औंध, कराड अशी संपन्न झाली. सहलीमध्ये एकूण 38 विद्यार्थी  आणि चार शिक्षक सहभागी होते.
 

या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक छान प्रकारचे ऐतिहासिक वास्तुकलेचे नमुने पहावयास मिळाले.  तुळजापूर येथे भवानी आईचे दर्शन घेतल्यानंतर ऐतिहासिक असा नळदुर्ग किल्ला मुलांना पहावयास मिळाला.


     

पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शना बरोबरच कैकाडी महाराजांच्या इथे प्राचीन काळचे 360 ऋषीमुनी संत यांचे छोटे मठ स्थापन केलेले आहेत. मुलांना एकाच ठिकाणी पूर्वीच्या संतांची माहिती मिळाली जी मराठी इतिहासाच्या विषयामध्ये उपयुक्त ठरली.
   

सोलापूर येथे श्री रामेश्वर मंदिरात शिवशंकराच्या दगडापासून बनवलेल्या 1008  शिवपिंडी तेथे स्थापन केलेल्या आहेत.शिवपिंडींची एक अनोखी  कला मुलांना पहावयास मिळाली.
      

गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा मठ पहावयास मिळाला व तेथील गोशाळेचे ज्ञान मुलांना मिळाले. गो शाळेमध्ये विविध प्रकारच्या गाईंची माहिती मुलांना देण्यात आली.


    

विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये चित्रकला हा विषय असतो. त्यामुळे चित्रकलचे विविध नमुने औंध येथील भवानी संग्रहालयात पहायला मिळाले. औंध येथे यमाई चे मूळ पीठ दर्शन घेतल्यानंतर समोरील भवानी संग्रहालयामध्ये कलेच्या एकूण 19 गॅलरी पाहायला मिळाल्या. यामध्ये वास्तुकला, धातू कला, पहाडी कला,तिबेटियन कला, संगमरवरी कला,अजिंठा चित्रे अशा प्रकारचे वेगवेगळे नमुने आणि चित्रे मुलांना पहावयास मिळाली. या चित्रांचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कला  हया पूर्वीच्या काळच्या महाभारत, रामायण,श्रीकृष्ण यांच्या कथांवर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या कलेबरोबरच पूर्वीच्या काळचे ज्ञान आणि माहिती  प्राप्त झाली.
     

कराड येथील कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर  श्री. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या आठवणी जागृत झाल्या.
    

कराड येथे श्री बाळासाहेब पाटील यांच्या साखर कारखान्याला मुलांनी भेट दिली.  तेथे विद्यार्थ्यांना उसापासून  साखर कशी तयार होते आणि त्याची प्रक्रिया कशी केली जाते हे  प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन पहावयास मिळाले.
  

विज्ञान विषयात पुस्तक ज्ञान देणाऱ्या पवन चक्की प्रत्यक्ष मुलांना  पहावयास  मिळाल्या. शैक्षणिक सहल ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष  ज्ञान देण्याचा एक उपक्रम असल्याने या  शाळेने शैक्षणिक सहलीचे सर्व नियम पाळून सहलीचे आयोजन केले होते त्यासाठी पैसा फंड मधील श्री खोचरे सर,श्री वंजारे सर,सौ.कोकाटे मॅडम,श्रीमती.निमले मॅडम यांनी सहलीचे नियोजन केले.
   

विद्यार्थ्यांनी तीन दिवसांमध्ये अनेक अशी छान स्थळ पाहिली आणि त्यांना वर्षभरातल्या ज्ञानाबरोबर या ज्ञानाची जोड ही मिळाली. मुलांनी हिंदी मराठी गाण्यांच्या भेंड्यांसोबतच अनेक मराठी  अभंग  छोट्या ढोलकीच्या साथी बरोबर प्रवासामध्ये गायले आणि त्याचा आनंद लुटला  यासाठी पालकांनीही त्यांचे धन्यवाद मानले. पालकांचेही खूप सहकार्य लाभले. यासाठी संस्था अध्यक्ष श्री. अनिल शेठ शेट्ये सचिव श्री. धनंजय शेट्ये सर,मुख्याध्यापक श्री.खामकर सर यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page